SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'16 लाखांचा दर निश्चित केला...', खाजगी कार्यक्रमाच्या नावाखाली अभिनेत्याकडे अश्लील मागणी! स्वत: केला खुलासा

आता एका अभिनेत्याकडे एका कार्यक्रमामध्ये अश्लिल मागणी केल्याचा अभिनेत्याने स्वत: खुलासा केला आहे. नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 25, 2026, 08:21 IST | Updated: Nov 25, 2026, 08:40 IST
Image Credit: काय म्हणाला अभिनेता? (फोटो सौजन्य - सोशल मिडिया)
Join

अनेकदा अभिनेत्रीच्या तोंडून अनेकदा कास्टिंग काउचच्या संदर्भात अनेक खुलासे किंवा अनुभव अभिनेत्री मुलाखतींमध्ये करत असतात. कास्टिंगच्या नावाने अभिनेत्रींकडे अश्लिल मागण्या केल्या जातात यासंदर्भात अनेकदा आपण ऐकले आहे, आता एका अभिनेत्याकडे एका कार्यक्रमामध्ये अश्लिल मागणी केल्याचा अभिनेत्याने स्वत: खुलासा केला आहे. टीव्ही अभिनेता अंगद हसिजा त्याच्या स्मार्ट लूक्स आणि फिटनेससाठी ओळखला जातो. तो अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. 'बिदाई' या शोमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली, त्याने आता एक धक्कादायक अनुभव त्याच्यासोबत शेअर केला आहे.

टीव्ही अभिनेता अंगद हसिजाने शार्दुलच्या पॉडकास्टवर त्याच्या आयुष्यातील सर्वात विचित्र आणि कठीण कॉलचा खुलासा केला. एका कार्यक्रमात त्याची फसवणूक होणार होती. अंगदने सांगितले की, त्याला एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी फोन आला होता. त्यावेळी देशा-विदेशात अनेक कार्यक्रम होत होते. त्या अभिनेत्याला कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते, परंतु तपशील देण्यात आला नव्हता. जेव्हा अंगदने विचारले की तो कार्यक्रमात काय करणार आहे—नृत्य करणार आहे की कोणते कपडे घालणार आहे—तेव्हा त्याला फक्त एवढेच सांगण्यात आले की तो एक खाजगी कार्यक्रम आहे.

हे ही वाचा

'मी दोषी आहे...' गर्लफ्रेंडला धोका दिल्यानंतर 'या' अभिनेत्याने सोशल मिडियावर मागितली माफी

पुढे अभिनेत्याने या प्रकरणासंदर्भात सांगितले की, असा अंदाज लावला होता की तो एक कौटुंबिक सोहळा असेल, ज्यात कमी गर्दी असेल. त्या अभिनेत्याला 15-16 लाख रुपयांची मोठी रक्कम देऊ करण्यात आली होती. ही रक्कम ऐकून अंगदला धक्काच बसला, कारण यापूर्वी त्याला कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी एवढी मोठी रक्कम कधीच मिळाली नव्हती. काहीतरी गडबड आहे हे त्याच्या लक्षात आले. त्या व्यक्तीने अंगदला वारंवार विचारले की तो कार्यक्रमाला उपस्थित राहू शकेल का आणि त्याला काही अडचण येईल का. हा प्रश्न ऐकून तो अभिनेता तणावात आला. त्यानंतर त्याने आपल्या शंकांचे निरसन केले.

पुढे म्हणाला, कार्यक्रमाचा तपशील विचारण्याचा आग्रह धरला, तेव्हा तो माणूस म्हणाला, "साहेब, तुम्हाला कदाचित आधीच माहीत असेल. तुम्हाला पैसे मिळतात हे सर्वांना माहीत आहे." या उत्तराने तो अभिनेता आश्चर्यचकित झाला. अंगदने कार्यक्रम नाकारण्यापूर्वीच, त्याला 16 लाख रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली. त्या कार्यक्रमासाठी अभिनेत्याचे मानधन 16 लाख रुपये होते. अंगदने तात्काळ पैसे परत केले आणि तो कार्यक्रम करण्यास नकार दिला. तो अभिनेता म्हणाला की, तो या सगळ्या प्रकारामुळे खूप अस्वस्थ होता. त्याने स्पष्ट केले की, त्या फोन कॉलमुळे तो तणावाखाली आला होता. सर्व कलाकारांना मानधन दिले जाते, हे सामान्य आहे, असे त्या अभिनेत्याला सांगण्यात आले. अंगदच्या म्हणण्यानुसार, त्या फोन कॉलमुळे त्याला खूपच अवघडल्यासारखे वाटले असे अभिनेत्याने सांगितले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES