SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'याची कल्पना केली नव्हती...' अभिनेत्याचे रातोरात घर झाले उद्ध्वस्त! स्वत: केला धक्कादायक खुलासा

अभिनेते-दिग्दर्शक राजू खेर यांनी त्यांच्या आयुष्यामधील धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेते-दिग्दर्शक राजू खेर हे हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. ते अनुपम खेर यांचे धाकटे भाऊ आहेत.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 04, 2026, 04:10 PM IST | Updated: Oct 04, 2026, 04:30 PM IST
Join

बॅालिवूडचे अभिनेते लाखो रुपये कमवत असतात आणि त्यामुळे त्यांची मुंबईमध्ये आलिशान घरे देखील आहेत. बॅालिवूडचा असा एक अभिनेता आहे ज्याला काही वेळातच सर्व काही गमवावे लागले होते. अभिनेते-दिग्दर्शक राजू खेर यांनी त्यांच्या आयुष्यामधील धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेते-दिग्दर्शक राजू खेर हे हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. ते अनुपम खेर यांचे धाकटे भाऊ आहेत. राजू खेर सहसा त्यांच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाहीत. आता त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एका अशा अंधकारमय काळाबद्दल खुलासा केला आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

अभिनेते-दिग्दर्शक राजू खेर यांनी एका मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. सिद्धार्थ कन्नन यांच्याशी झालेल्या संभाषणात राजू खेर यांनी सांगितले की, एका चॅनलच्या कार्यक्रमामध्ये अभिनेत्याने गुंतवणूक केली होती. ज्या चॅनलमध्ये गुंतवणूक केली होती ते चॅनेल अचानक गायब झाले. यावर बोलताना अभिनेत्याने सांगितले की, एक चॅनल येणार होते. मी माझे घर विकले होते. मी पैसे दुसरीकडे दिले होते. मी नवीन घर बुक केले होते. अचानक मला कळले की ते चॅनल बंद पडले आहे, एक नवीन चॅनल येणार होते, ज्यात मोठे लोक पैसे गुंतवत होते असे त्यांनी सांगितले.

पुढे अभिनेता म्हणाला की, मी एक कार्यक्रमही बनवला होता. त्या कार्यक्रमाचे नाव होते 'लाइफ के लिए कुछ भी करेगा'. अभिनेत्याला वाटले होते की, त्याने ज्या चॅनेलमध्ये गुंतवणूक केली आहे त्यानंतर त्याचे आयुष्य मार्गी लागेल. त्याने सांगितले की घर विकून मिळालेले पैसे त्याने चॅनलमध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी गुंतवले होते. त्याला वाटले होते की ते ४ बीएचके घर असेल, ज्यात प्रत्येकाला स्वतःची खोली मिळेल. त्याचे आयुष्य मार्गी लागेल. पण ते चॅनल अचानक गायब झाले. त्याने खरेदी केलेल्या फ्लॅटचे काय होईल, असा प्रश्न त्याला पडला. ते पैसे कुठे गेले? असे अनेक प्रश्न पडले होते.

पुढे अभिनेत्याने सांगितले की, "मी विचार केला की माझ्या भावाकडे मदत मागावी. तोच मदत करेल असं वाटलं होतं. पण माझ्या भावाकडेही पैसे नव्हते. त्याने काम करणं सोडून दिलं होतं. त्यावेळी मला वाटलं की माझा भाऊ मला मदत करत नाहीये.  मी बाथरूममध्ये एक मासिक वाचत होतो. त्यात लिहिलं होतं की अनुपम खेर म्हणाले होते, 'माझं स्वतःचं मूल असतं तर बरं झालं असतं.' तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी माझ्या भावाबद्दल असा विचारच केला नव्हता. आम्ही त्याला गृहीत धरलं होतं. त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे याचा आम्ही कधीच विचार केला नाही. तो सिकंदरला आपला मुलगा मानतो, पण जेव्हा त्याला स्वतःचं मूल होईल, तेव्हा गोष्ट वेगळी असेल." 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES