आयपीएल 5 वेळा विजेतेपद जिंकणार संघ चेन्नई सुपर किंग्ज आता आयपीएल 2027 मध्ये नव्या अवतारात दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने त्यांचे मुख्य प्रशिक्षकांना पदावरुन हटवण्यात आले आहे. फक्त त्यांनाच नाही तर संघाने अलीकडेच आपल्या प्रशिक्षण स्टाफमधील अनेक अनुभवी प्रशिक्षकांना हटवले आहे. सीएसकेच्या संघाने भारताचा विश्वचषक विजेता माजी खेळाडू झहीर खान याला मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे. त्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने, या फ्रँचायझीने नवीन प्रशिक्षकांचीही नियुक्ती केली आहे. कोणत्या प्रशिक्षकांना कोणती जबाबदारी देण्यात आली आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
प्रशिक्षणातील बदलांमुळे, दशकभर किंवा त्याहून अधिक काळ सीएसकेसोबत असलेले अनेक वरिष्ठ सहाय्यक कर्मचारी संघातून बाहेर पडले आहेत. सीएसकेच्या संघामधील फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी, गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सायमन, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक ग्रेग किंग आणि फिजिओथेरपिस्ट टॉमी सिमसेक यांचा समावेश आहे. तथापि, फ्रँचायझीने सहायक गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स फॉस्टर आणि वरिष्ठ अधिकारी ए. आर. श्रीकांत यांना मागील हंगामापासून कायम ठेवले आहे. आता फ्रँचायझीने कोणते बदल संघामध्ये केले आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
हे ही वाचा
झहीर खानला मुख्य प्रशिक्षकपदी सीएसकेच्या संघात नियुक्ती केल्यानंतर, फ्रँचायझीने इंग्लंडमधून एक, दक्षिण आफ्रिकेतून एक आणि भारतातून एक, अशा तीन नवीन प्रशिक्षकांची नियुक्तीही केली आहे. भारतीय संघाचे बॅालिंग कोच मॅार्ने मॅार्केल यांचा भाऊ आणि सीएसकेचा माजी खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या अल्बी मॉर्केलची झहीर खानचा उपप्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तो सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहित शर्मा देखील सीएसकेचा भाग होता, तो आता आगामी सिझनमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इंग्लंडच्या गॅरेथ बॅटीचीही सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोहित 2013 ते 2015 या काळात आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळला. त्यानंतर तो इतर अनेक संघांकडून खेळला. दुसरीकडे, मॉर्केल देखील बऱ्याच काळापासून चेन्नई संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे. फ्रँचायझीने त्याची नियुक्ती आपल्या SA20 संघ, जोबर्ग सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदीही केली आहे. चेन्नईने XXI वर या तिघांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.