भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघामध्ये एकदिवसीय मालिकेच्या शेवटचा आणि तिसरा सामना खेळवला जात आहे, या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यामध्ये देखील टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात भारताच्या संघाने झिम्बाब्वेला 131 धावांवर रोखले. झिम्बाब्वेचा संघ फक्त 31.5 ओव्हरमध्ये सर्वबाद झाला या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमालीची कामगिरी केली आहे. झिम्बाब्वेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांना महागात पडला, या सामन्यात टीम इंडियाच्या युवा गोलंदाज वैष्णवी शर्माने संघासाठी धूमाकुळ घातला.
भारताची 20 वर्षीय फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माने 10 ओव्हरच्या स्पेलमध्ये 39 धावा देऊन 5 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. ती झिम्बाब्वेच्या फलंदाजांसाठी एक कोडे ठरली. वैष्णवी शर्माने मॉडेस्टर मुपाचिकवा, प्रिय बिझा, चिएद्झा धुरुरु, मिचेल मावुंगा, न्याशा ग्वांझुरा या झिम्बाब्वेच्या फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. क्रांती गौडने 7 ओव्हरच्या स्पेलमध्ये केवळ 23 धावा देऊन 2 विकेट्स घेतले. दरम्यान, सायली सातघरेने 6 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 11 धावा देऊन 2 विकेट्स घेतले. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
हे ही वाचा
वैष्णवी शर्माने अंडर 19 संघामध्ये कमालीची कामगिरी केली होती, त्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय संघामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. वैष्णवी शर्माचा जन्म 18 डिसेंबर 2005 रोजी ग्वाल्हेर , मध्य प्रदेशमध्ये झाला. ती भारतीय महिला राष्ट्रीय संघासाठी डावखुरी ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज म्हणून खेळते. शर्मा 2025 चा 19 वर्षांखालील टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होती आणि स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होती. आजच्या सामन्यामध्ये तिने पाच विकेट्स घेऊन ती पुन्हा चर्चेत आली आहे.
𝙈𝙖𝙞𝙙𝙚𝙣 𝙁𝙄𝙁𝙀𝙍 𝙞𝙣 𝙊𝘿𝙄𝙨 Vaishnavi Sharma's brilliance on display Updates https://t.co/j7kcglDDH0 #TeamIndia | #INDvZIM | @mflone_ https://t.co/SIFWpGZxxD
— BCCI Women (@BCCIWomen) October 28, 2026
आजच्या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर 25 धावांवर 3 विकेट्स गमावल्यानंतर जोसेफिन न्कोमो आणि चिएद्झा धुरुरु यांनी चौथ्या विकेटसाठी 40 चेंडूंमध्ये 27 धावा जोडून झिम्बाब्वेचा डाव वाचवण्याचा प्रयत्न केला. धुरुरु 20 धावा करून वैष्णवी शर्माची बळी ठरली. दुसरीकडे, कर्णधार न्कोमो 67 चेंडूंमध्ये 35 धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत 4 चौकार मारले. यानंतर, झिम्बाब्वेच्या नियमित अंतराने विकेट पडत गेल्या आणि संपूर्ण संघ केवळ 131 धावा करून सर्वबाद झाला. न्याशा ग्वांझुराने 10 धावा केल्या, तर मिशेल मावुंगा 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.