Pune MLC Election Result 2026: महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल पुण्यात लागला आहे. पुण्यात भाजपच्या सर्वात दिग्गज उमेदवाराचा पराभव झाला आहे. पुणे पदवीधर विभाग निवडणूकीत पवारांच्या राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख विजयी झाल्या आहेत. भाजपच्या स्मिता जाधव यांचा पराभव झाला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.
पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या दोन्ही मतदारसंघाचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. शिक्षक मतदारसंघावर पहिल्यांदात भाजपने कौस्तुभ गावडे यांच्या माध्यमातून आपला झेंडा रोवला आहे. त्यांनी सेनेचे प्रा. सचिन सानप यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पदवीधर मतदारसंघाने मात्र, भाजपला पुन्हा एकदा हुलकावणी दिल्यात जमा आहे. पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी पवार गटाच्या हर्षदा जाधव निवडून आल्यात.
पुणे शिक्षकवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. 23हजार 117 मते घेऊन भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी घोषित झाले आहेत. पदवीधर मतदार संघात मात्र, पुन्हा राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला आहे. महायुतीच्या डॉ. स्मिता जाधव यांचा पराभव झाला आहे.
महायुतीत बिघाडी झाल्याने पुणे शिक्षकच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. याच चुरशीच्या चौरंगी लढतीत भाजपच्या कौस्तुभ गावडे यांनी तब्बल 23 हजार 117 मतं घेत अखेर शेवटच्या बाद फेरीत विजय मिळवला. शिवसेवेचे उमेदवार प्रा. सचिन सानपही यांनीही त्यांना जोरदार लढत दिली. पण लढत चौरंगी झाल्याने विजयी उमेदवाराला शेवटपर्यंत 25 हजारांचा कोटा काही पूर्ण करता आलाच नाही. तरीही सानपांनी विजयी उमेदवाराचे आभार मानले तर तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेल्या प्रा. दत्ता सावंत सरांनी पैसे वाटपाचे आरोप केले.
पुणे पदवीधर मध्ये भाजपच्या उमेदवाराला महायुतीने पाठिंबा देऊनही विजय मिळवता आला नाही. इकडे मविआच्या हर्षदा जाधव यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवल्याने पदवीधरची जागा राष्ट्रवादीकडून हिसकावण्याचं भाजपचं स्वप्न अधुरंच राहिल आहे. त्यामुळे अंकुश काकडे यांनी मतदानादिवशी झी 24 तासच्या सर्वपक्षीय पुणेरी गप्पांदरम्यान, गुलाल हा आमचाच, हा दावा अखेर खरा ठरला आहे.
अशा पद्धतीने पुणे शिक्षक मध्ये भाजपसाठी खुशीचा तर पुणे पदवीधर मधे गमचा माहौल पहायला मिळत आहे. याउलट पवारांची राष्ट्रवादी विन विन सिच्युवेशनमधे राहिली. काँग्रेसने माञ, पुणे शिक्षकला आहे तोच उमेदवार रिपीट केल्याने दारूण पराभव स्वीकारावा लागला. पुणे शिक्षकचे विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेलेत. परिणामी पुणे शिक्षक मध्ये विद्यमान आमदार पुन्हा निवडून न येण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली.