• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! भारताचा हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! भारताचा हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

टी20 मालिका झाल्यानंतर भारत न्यूझीलंडविरुद्द पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, या मालिकेआधी भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 28, 2026, 06:35 PM IST|Updated: Oct 28, 2026, 07:00 PM IST
joinshare
एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! भारताचा हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो पण... '; राज ठाकरेंनी कर्जतच्या सभेतून दिला जाहीर इशारा, 'गुजरातची दोन माणसं आमचा महाराष्ट्र...'

'अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो पण... '; राज ठाकरेंनी कर्जतच्या सभेतून दिला जाहीर इशारा, 'गुजरातची दोन माणसं आमचा महाराष्ट्र...'

2

दिवाळीला बाजारातील मिठाई विसरा, 3 पदार्थांत तयार करा स्वादिष्ट दूध पेडा

3

वृक्षतोड थांबवण्यासाठी हात जोडताय, तुमचे कोयते काय करतायत? राज ठाकरे यांचे थेट स्थानिकांना आवाहन

4

कर्जतमध्ये राज ठाकरेंचे भाषण सुरु होण्याआधीच मोठा गोंधळ! सभा सुरु होण्याआधीच घडलं असं काही

5

'अंदाज लावा काँग्रेसने किती जागा जिंकल्या असतील?', MLC निकालानंतर पंतप्रधान मोदींचा टोला, म्हणाले 'बॅलेट पेपरवरच निवडणुका...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारताचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, या दौऱ्यावर टीम इंडिया सध्या पाच सामन्यांची टी20 मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. भारताच्या संघाने टी20 मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे, त्यानंतर टीम इंडिया टी20 मालिका झाल्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचे पाच सामने खेळवले जाणार आहेत, ही एकदिवसीय मालिका सुरु होण्याआधी भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागेवर बीसीसीआय कोणत्या खेळाडूला स्थान मिळणार यासंदर्भात जाणून घ्या.

भारताचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांचे न्यूझीलंडविरुद्ध बीसीसीआयने घोषणा केलेल्या संघामध्ये स्थान मिळाले होते. पण प्रसिद्ध अद्याप हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही, त्यामुळे तो एकदिवसीय मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे आता प्रसिद्ध कृष्णा याच्या जागेवर भारताच्या संघामध्ये कोणत्या बदली खेळाडूला भारतीय संघामध्ये स्थान मिळणार याकडे सर्वांची नजर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (BCCI) एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या जागी आकिब नबीचा एकदिवसीय संघात समावेश केला जाऊ शकतो. आकिब नबीने कसोटीमध्ये पदार्पण केले होते पण त्याला खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही.

हे ही वाचा

W, W, W, W, W... झिम्बाब्वेविरुद्ध 20 वर्षीय गोलंदाजांचा धुमाकूळ! कोण आहे वैष्णवी शर्मा?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये 4 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे, प्रसिद्ध कृष्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे तो सध्या पूर्णपण फीट आहे की नाही हे 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी समजेल. कारण बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्या मॅच सिम्युलेशन आणि फिटनेस चाचण्या होणार आहेत. संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समितीचा असा विश्वास आहे की प्रसिद्ध कसोटी सामन्यांसाठी पूर्णपणे तंदूरुस्त असावा, कारण एकदिवसीय सामने झाल्यानंतर कसोटी मालिका दोन सामन्यांची होणार आहे त्यामध्ये भारताच्या संघासाठी ही मालिका फार महत्त्वाची असणार आहे. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त होता. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली होती. प्रसिद्धला संघात केवळ पहिल्या तीन सामन्यांसाठी स्थान मिळाले. प्रसिद्ध कृष्णाची उपलब्धता त्याच्या तंदुरुस्तीवर आणि डाव्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरण्यावर अवलंबून होती, परंतु पीटीआयच्या वृत्तानुसार, प्रसिद्धला मालिकेतून वगळण्यात आले आहे. तथापि, बीसीसीआयने याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News
Sports News