Raj Thackeray Karjat Daura : कर्जतमधील वृक्षतोडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांनी कर्जतमधील सायडोंगरावर जात पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी डोंगरावर वृक्षारोपण देखील केले. त्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावात भेट देत प्रकल्पग्रस्तांसोबत संवाद साधला. राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा देखील आहे. सभेमधून राज ठाकरे वृक्षतोडीबाबत पुढील भूमिका मांडण्याची शक्यता. मात्र, कर्जतमध्ये राज ठाकरेंचे भाषण सुरु होण्याआधीच कनेक्शन बंद झाले. सभा सुरु होण्याआधीच मोठा गोंधळ निर्माण झालाय यामुळे मानसे नेते संतपाले.
सभा सुरु होण्यासाठी अवघा काळी वेळ शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या सभेला पुरविण्यात आलेल इंटरनेट बंद झाले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही माहिती दिली. सभास्थळी LAN केबल द्वारे जे इंटरनेटचे आयोजन करण्यात आले आहे. ते बंद केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
हे सरकार घाबरले का? संदीप देशपांडे यांचा सवाल सध्यस्थित मोबाईल इंटरनेट सुरुळीत पण. सभेसाठी घेण्यात आलेल इंटरनेट कनेक्शन बंद करण्यात आल्याचा आरोप आणि माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर इंटरनेट सेवा सुरु झाली आणि सभेला सुरुवात झाली. इंटरनेट बंद झाल्यामुळे सभा सुरु होण्यासा उशीर झाल्याचा दावा मनसे नेत्यांनी केला आहे.
झाडं कापुन दुसरीकडे झाडं लावणार , मग जिथे झाडं लावणार तिथेच प्रकल्प का नेत नाही, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांनी उपस्थित केला. तसंच दिल्लीतले दोन गुजराती सह्याद्रीचं भवितव्य ठरवत असल्याचं वक्तव्य संदीप देशपांडेंनी केले.