• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /'अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो पण... '; राज ठाकरेंनी कर्जतच्या सभेतून दिला जाहीर इशारा, 'गुजरातची दोन माणसं आमचा महाराष्ट्र...'

'अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो पण... '; राज ठाकरेंनी कर्जतच्या सभेतून दिला जाहीर इशारा, 'गुजरातची दोन माणसं आमचा महाराष्ट्र...'

कर्जतमधील जंगलतोडीला विरोध करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना इशारा दिला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 28, 2026, 07:52 PM IST|Updated: Oct 28, 2026, 08:13 PM IST
joinshare
'अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो पण... '; राज ठाकरेंनी कर्जतच्या सभेतून दिला जाहीर इशारा, 'गुजरातची दोन माणसं आमचा महाराष्ट्र...'
Image Credit: राज ठाकरेंचा अमित शाहांना इशारा

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
मधुमेह नियंत्रणात असूनही धोका कायम आहे का? हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीच्या नुकसानामागील कारणे - डॉ. विजय चिले

मधुमेह नियंत्रणात असूनही धोका कायम आहे का? हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीच्या नुकसानामागील कारणे - डॉ. विजय चिले

2

जो महाराष्ट्र शिवरायांचंही ऐकणार नसेल त्याला परमेश्वराने वाचवावं; राज ठाकरेंचा संताप, 'पेटून उठा आणि...'

3

हायपरटेन्शन, ताणतणाव आणि हृदयाचे आरोग्य, उच्च रक्तदाब समजून घ्या, धोके ओळखा आणि हृदयाची काळजी घ्या - डॉ. नितीन एन. बोटे

4

स्मृती मंधानाच्या संघाने झिम्बाब्वेला केले क्लीन स्वीप! 8 विकेट्सने टीम इंडियाने मिळवला विजय

5

'अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो पण... '; राज ठाकरेंनी कर्जतच्या सभेतून दिला जाहीर इशारा, 'गुजरातची दोन माणसं आमचा महाराष्ट्र...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

गुजरातमधली दोन माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार, सह्याद्री पोखरणार असा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा आवाज येत नाही अशा शब्दांत इशाराही दिला. कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात आयोजित सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी आमदार, खासदार यांच्यावरही ताशेरे ओढले.

"अमित शाह मला तुम्हाला सांगायचं आहे की, मेहता वैगेरे सगळे तुमचे मित्र असतील. कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काटीचा आवाज येत नाही. ती ज्या दिवशी बसेल तेव्हा तुम्हाला आपण काय पापं केली आहेत ते कळेल," असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

गुजरातमधली दोन माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार, सह्याद्री पोखरणार

"गुजरात्यांसाठी जंगल कापलं आहे. या प्रकल्पांची गरज काय? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना केंद्रातल्या दोघांकडून शून्य किंमत आहे. आम्ही जे सांगू ते महाराष्ट्रात झालं पाहिजे. महाराष्ट्र गुजरात्यांच्या हातात जायला नको हे मी विधानसभेत सांगत होतो. ही हिंमत तुमच्यातूनच येते . निवडणूकीच्या तोंडावर जात, धर्म, पैशाच्या नावावर यांना मतदान करायचं. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की केंद्राने ठरवलं हा प्रकल्प करायचा. गुजरातमधली दोन माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार, सह्याद्री पोखरणार," असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे

"महाराष्ट्र कुठे घेऊन चाललो आहोत. महाराष्ट्राला राग येत नाही, चीड येत नाही. आम्ही रोजच्या व्यवहारात गुंतलो आहोत. कुठेही संकट आलं तरी महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे. नाहीतर यांनी हवं ते साध्य करता येईल," असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. 

छत्रपतींना काय वाटत असेल याचा विचार करा

महाराष्ट्रातील आमदार खासदार करतात काय? इतके लाचार का झाले आहेत. एकजण बोलत नाही. सत्तेवर तुम्ही बसवलंत आणि ते पद जाईल म्हणून तुमच्याबद्दल बोलायला तयार होत नाहीत. काय करायचं या लोकांचं? कशासाठी निवडून देत आहात? एकदा आकाशात पाहा आणि छत्रपतींना काय वाटत असेल याचा विचार करा. ज्या सह्याद्रीवर मी खेळलो, बागडलो.  शत्रुला ज्या सह्याद्रीवर संपवला तोच आज महाराष्ट्रात संपवला जात आहे आणि आपण सगळे हतबल बनून पाहत आहोत. महाराजांना नुसचे हार घालून काय फायदा? असं संतापही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महाराजांचं आज्ञापत्र वाचून दाखवलं ज्यामध्ये झाडं लेकरांप्राणे वागवावीत असं सांगण्यात आलं होतं. 
 

तुम्हाला अल्पमतात आणत आहेत

संपूर्ण सह्याद्रीच्या कुशीत 23 प्रकल्प येत आहेत. त्यातील काही बाहेरचे आहेत. तीन प्रकल्प केंद्र सरकारचे आहेत आणि बाकी 20 अदानी हायड्रो, मेघा इंजिनिअरिंग, जेएसडब्ल्यू, टाटा, अदानी, ग्रीनको यांचे आहेत सांगत त्यांनी यादीच वाचून दाखवली. हे सर्व खासगी प्रकल्प आहेत. मी पैसे टाकतो जंगल तोडून द्या, माणसं मारुन द्या सांगतात. 236 वीजनिमिर्तीचे प्रकल्प येत आहे. पुढील गोष्टींसाठी हे प्कल्प येत आहेत. कोळशावर चालणारे 40 प्रकल्प येत आहेत. कोणासाठी प्रकल्प येत आहेत? कोणासाठी, कशासाठी आणत आहेत? नीट गोष्टी पाहिल्या तर मतदारसंघ फोडत आहेत. तुम्हाला अल्पमतात आणत आहेत. तुम्ही कमी होणार आणि बाकीचे वाढणार. त्यासाठी वीज रस्ते हवेत. पण आम्ही बेसावध आहोत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Raj Thackeray
PM Narendra Modi
Amit Shah