Raj Thackeray Karjat Daura : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पामुळं कर्जत-भीमाशंकर पट्ट्यात शेकडो झाडांची कत्तल सुरु आहे.. झाडांच्या या कत्तलीविरोधात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांनी वृक्षतोडीची पाहणी केली. यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली. वृक्ष तोड थांबवण्यासाठी हात जोडतायं, तुमचे कोयते काय करतायतं? असं म्हणतं राज ठाकरे यांनी थेट स्थानिकांनाच आक्रमक प्रश्न विचारला.
कर्जतमध्ये वृथ तोडीची पाहणी करत असताना अनेकांनी मला हात जोडून वृक्ष तोड थांबवण्याची विनंती केली. तुमचे कोयते काय करतात? तुमचे कोयते काय फांद्या कापायला आहेत का असा सवाल राज ठाकरे यांनी स्थानिकांना केला.
वाडा, जव्हार येथून लोक वृक्ष तोड करण्यासाठी येत आहेत. कर्जतच्या दरवाजावर टकटक झाली उद्या पालघरच्या होणार. प्रकल्पाचं टेंडर नाही , काही नाही प्रकल्प देऊन टाकलाय असं राज ठाकरे म्हणाले.
गुजरातमधली दोन माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार, सह्याद्री पोखरणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
गुजरात्यांसाठी जंगल कापलं जात आहे. या प्रकल्पांची गरज काय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना केंद्रातल्या दोघांकडून शून्य किंमत मिळत आहे. आम्ही जे सांगु ते महाराष्ट्रात झालं पाहिजे. महाराष्ट्र गुजरात्यांच्या हातात जायला नको हे मी विधानसभेत सांगत होतो. ही हिंमत तुमच्यातूनच येते कुठून. निवडणूकीच्या तोंडावर जात, धर्म, पैशाच्या नावावर यांना मतदान करायचं. हा 30-35 टक्के
मतदार, बाकी निवडणूक आयोग आहेच. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की केंद्राने ठरवलं हा प्रकल्प करायचा. गुजरातमधली दोन माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार, सह्याद्री पोखरणार आहेत.
प्रकल्पाचं टेंडर नाही, काही नाही प्रकल्प देऊन टाकला आहे. ग्रामिण भागातला जेन झी कधी जागा होणार? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
असे थंड आणि शांत बसणार असाल तर मला नाही तुमचं नेतृत्व करायचं, मला नाही इथे यायचं
दरम्यान. राज ठाकरेंची सभा सुरु होण्यापूर्वी मोठा गोंधळ झाला होतात. असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या सभेला पुरविण्यात आलेल इंटरनेट बंद झाले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही माहिती दिली. सभास्थळी LAN केबल द्वारे जे इंटरनेटचे आयोजन करण्यात आले आहे. ते बंद केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यावर देखील राज ठाकरेंनी भाष्य केले. इंटरनेट कापलं पण या समोरच्या नेटवर्कचं काय कराल? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.