Nitesh Karale Nagpur MLC Election Result 2026: महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांच्या निकालांचे चित्र आता स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत आले आहे ते कराळे मास्तर अर्थात नितेश कराळे. पराभूत होऊनही नितेश कराळे मास्तरांचा भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांना जबरदस्त धक्का दिला आहे. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, अशी फिल्मी डॉयलॉगबाजी नितेश कराळे यांनी केली आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीवर कराळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पराभव झाला असला तरी महाराष्ट्रात आपली चर्चा सुरु आहे. आपण कुणाचाही गेम पलटवू शकतो, असंही ते म्हणाले.
नागपूर पदवीधर निवडणुकीत नितेश कराळेंची कमाल
नागपूर पदवीधर मतमोजणीत अपक्ष उमेदवार वर्धेचे खदखद गुरुजींनी केली कमाल केली. मातब्बर पक्षांच्या उमेदवारांना नितेश कराळेंनी घाम फोडला. नागपूर पदवीधर मतमोजणीत एकीकडे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर सुरू असताना अपक्ष म्हणून रणांगणात उतरलेले खदखद गुरुजी नितेश कराळे यांनी पहिल्या पसंतीत तब्बल 24 हजार 249 मत घेत सगळ्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जोरदार धक्का दिला. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत कराळे गुरुजी किंगमेकर च्या भूमिकेत समोर आले.
ना भाजपसारखी संघटनात्मक ताकद यंत्रणा, ना काँग्रेसचा झेंडा तरीही कराळे गुरुजींनी घेतलेली झेप थक्क करणारी आहे. आणि भाजप आणि काँग्रेस नेत्यांनाही धक्का देणारी आहे. आपल्या खास विदर्भयानशैलीत स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कराळे गुरुजींनी गेल्या पदवीधर निवडणुकीत 6 हजार 889 मत घेतली होती.
सोशल मीडियावर तुफान चर्चेत असणारे कराळे गुरुजी 2026 मध्ये नागपूर पदवीधर साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तिकीट मागत होते. पक्षाने ऐनवेळी हात वर केले. कराळेंनी थेट अपक्ष म्हणून तलवार उपसली. पक्षाने कारवाई केली तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि लढले.
एकीकडे भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्याकरता खुद्द मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपच्या मातब्बर नेते प्रचार करताना दिसून आले. दुसरीकडे काँग्रेसने अभिजीत वंजारी सारखे चाणक्ष मातब्बर उमेदवार रिंगणात होते. मात्र त्यानंतरही नितेश कराळे यांनी पहिल्या पसंती घेतलेली 24 हजार 249 मते भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांसाठी दुसऱ्या पसंती मध्ये निर्णय ठरताना दिसत आहे.