WPL 2027 Auction Live Streaming : महिला प्रिमियर लीग 2027 चा पाचवा सिझनला आजपासून सुरुवात होणार आहे. या लिलावासाठी 186 खेळाडू उपलब्ध आहे आणि यामधील जास्तीत जास्त 27 खेळाडू खरेदीसाठी पात्र ठरणार आहेत. कारण हा मिनी लिलाव आहे त्यामुळे मग यापैकी 20 खेळाडू भारतीय असणार आहेत तर त्यामधील 7 खेळाडू हे परदेशी असणार आहेत. आता हा लिलावासाठी भारतीय संघातील काही महत्त्वाचे खेळाडूंच्या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे त्यामुळे आता या लिलावाची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
पाचव्या हंगामासाठीचा मिनी लिलाव आज, बुधवार, 28 ऑक्टोबर 2026 रोजी कोची येथे होणार आहे. डब्ल्यूपीएल लिलाव प्रक्रिया कोचीमध्ये आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना लिलावात एकूण 27 जागा भरायच्या आहेत, त्यापैकी 20 जागा भारतीय खेळाडूंसाठी आहेत. हा लिलाव कोची येथील ग्रँड हयातमध्ये सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल. लिलाव सुरू होण्यापूर्वी बीसीसीआय आणि डब्ल्यूपीएल अधिकाऱ्यांची संक्षिप्त भाषणे होतील. हा एक मिनी लिलाव असल्याने, तो केवळ काही तास चालेल.
हे ही वाचा
महिला प्रिमियर लीग 2027 च्या लिलावाचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण हे तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कला भेट द्यावी लागेल. तुम्ही विविध स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहू शकता. जर तुम्ही स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही किंवा टॅबलेटवर 2027 डब्ल्यूपीएल लिलाव थेट पाहण्यासाठी, तुम्हाला जिओहॉटस्टार ॲपवर लॉग इन करावे लागेल. तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहण्यासाठी, तुम्हाला हॉटस्टार वेबसाइटवर लिलावाची लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता.
THE place for all your #TATAWPLAuction Updates Visit https://t.co/eU4871P5mp for everything Auction related! Tune-in to the #TATAWPL Auction 2027 at 5.30 PM IST! https://t.co/ZG7Nz2T5vU
— Women's Premier League (WPL) (@wplt20) October 28, 2026
लिलावासाठी सर्वोच्च मूळ किंमत 50 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. खेळाडूंची पुढे 40 लाख, 30 लाख, 20 लाख आणि 10 लाख रुपयांच्या मूळ किंमतींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च मूळ किंमतीच्या गटात केवळ दोन खेळाडू आहेत: इंग्लंडची सोफिया डंकले आणि ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाज मॉलिन्यू.