• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...

20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...

हा व्हिडीओ पाहून लाखो रुपये चोरीला गेल्यानंतर हा व्यापारी संपूर्ण ताकदीने या व्यक्तींचा पाठलाग करु शकला असता असं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र तो तर हातातली कचोरीही खाली न टाकता चोरांमागे पळत सुटल्याचंही व्हिडीओत दिसतंय.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 28, 2026, 03:40 PM IST|Updated: Oct 28, 2026, 03:51 PM IST
joinshare
20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...
Image Credit: सोशल मीडियावर याच व्हिडीओची चर्चा

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
CSK च्या ताफ्यात तीन नव्या प्रशिक्षकांचा समावेश; कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल!

CSK च्या ताफ्यात तीन नव्या प्रशिक्षकांचा समावेश; कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल!

2

शिवसेनेत फूट का पडली? शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून ठाकरेंचे वकिल हसले; असं म्हणाले तरी काय?

3

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीने उधळला गुलाल! किरण सरनाईक यांचा सलग दुसऱ्यांदा विजय

4

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

5

दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

'नजर हटी, दुर्घटना घटी' हे वाक्य तुम्ही हायवेने प्रवास करताना अनेकदा वाचलं असेल. मात्र याच वाक्यप्रचाराची आठवण करुन देणारा प्रकार राजस्थानमधील जयपूरमध्ये घडला असून संपूर्ण घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे. येथील एका व्यापऱ्याला 20 रुपयांची कचोरी तब्बल 20 लाख रुपयांना पडली आहे. या व्यपाऱ्यासोबत जे काही घडलं ते कॅमेरामध्ये कैद झालं आहे.

कुठे घडला हा सारा प्रकार?

हा सारा प्रकार सोमवारी नाहरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याच सीसीटीव्हीच्या आधारे आता पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. ही चोरी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.  20 लाख रुपयांची कॅश घेऊन जात असतानाच अचानक भूक लागल्याने दुचाकीवरुन जाणारा हा व्यापारी कचोरीच्या ठेल्याजवळ थांबला. त्याने स्कूटरवर पुढल्या बाजूला ठेवलेल्या पिशवीमध्ये 20 लाख रुपये कॅश असल्याने दुचाकीवरुन न उतरता तिच्यावर बसूनच कचोरी खाण्याचा आणि भूक शमवण्याचा निर्णय त्याने घेतला. मात्र त्याचवेळी या अरुंद गल्लीमध्ये मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी या व्यापाऱ्याच्या स्कूटीवरील 20 लाख रुपये कॅश असलेली पिशवी उचलून नेली. 

सीसीटीव्हीमध्ये काय दिसतंय?

चंपलाल नावाचा व्यापारी प्रचंड भूक लागल्याने कचोरी खाण्यासाठी थांबला होता. त्याने रोख रकमेची बॅग आपल्या स्कूटरच्या समोर ठेवली होती, तेव्हाच दोन व्यक्तींनी ती बॅग उचलली आणि पळ काढला, असं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. चंपलाल यांनी संशयितांचा पाठलाग केला, स्थानिक लोकही मदतीला धावून आले, परंतु ते दोघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे चोरांचा पाठलाग करतानाही चंपालाल यांनी हातातली अर्धवट खाल्लेली कचोरी सोडली नाही. तें कचोरी हातात घेऊनच चोरांचा पाठलाग करु लागल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये चंपलाल आरामात आपल्या स्कूटरवर बसून कचोरी खाताना दिसत आहे. कचोरी खाण्यात मग्न असतानाच, शेजारी दुसरी एक स्कूटर येऊन थांबते. त्यावरील मागे बसलेली व्यक्ती चपळाईने चंपालाल यांच्या समोर पायाजवळ स्कूटीवर पडलेली रोख रकमेची बॅग हिसकावून घेते आणि दोघेही तिथून पळून जातात. चंपलाल, यांना काही कळण्याच्या आधीच चोरांनी तिथून धूम ठोकली. चंपालाल यांना काय झालंय हे समजल्यानंतर ते गाडीवरुन उतरले आणि हातात कचोरीची प्लेट तशीच पकडत चोरांमागे धावू लागले. हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. 

Thieves steal ₹20 lakh while man eats kachori in Jaipur, he chases them with kachori in hand https://t.co/ikzvK0ROsP

— The Indian Idiot (@theindianidiot) October 28, 2026

पोलिस परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हेल्मेट घातलेल्या त्या दोन व्यक्तींची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. चंपलाल यांच्या तक्रारीवरून नाहरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र 20 लाखांची चोरी झाल्यानंतर तरी चंपलाल यांनी कचोरीचा नाद सोडून थेट आपल्या दुचाकीवरुन त्यांचा पाठलाग करायला पाहिजे होता असं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Viral News