SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'रावण हा पूर्णपणे दुष्ट नाही...' अभिनेत्री साई पल्लवीच्या वक्तव्यामुळे नवा वाद! पहा Video

मागील काही दिवसांपासून सातत्याने 'रामायण' सिनेमाची चर्चा पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनाच्या वेळी एक वक्तव्य केले आहे त्यानंतर आता पुन्हा एक नवा वाद सुरु झाला आहे, नक्की काय म्हणाली साई पल्लवी यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 28, 2026, 10:42 PM IST | Updated: Oct 28, 2026, 10:55 PM IST
Join

नितेश तिवारी यांचा आगामी सिनेमा 'रामायण' मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या सिनेमाचे मागील काही दिवसांपासून जोरदार प्रमोशन केले जात आहे, रणबीर कपूर प्रभू राम यांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सिनेमामध्ये अभिनेत्री साई पल्लवीने माता सीतेची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अनेक वाद उकळत आहेत, त्यामुळे मागील काही दिवसांपासून सातत्याने या सिनेमाची चर्चा पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनाच्या वेळी एक वक्तव्य केले आहे त्यानंतर आता पुन्हा एक नवा वाद सुरु झाला आहे, नक्की काय म्हणाली साई पल्लवी यासंदर्भात सविस्तर वाचा.

लॉस एंजेलिसमध्ये चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरप्रसंगी ती म्हणाली की, ही कथा लोकांना आत्मपरीक्षण करण्यास, स्वतःमधील चांगले-वाईट ओळखण्यास आणि कालांतराने अधिक चांगले व्यक्ती बनण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करते. अभिनेत्री साई पल्लवी पुढे म्हणाली की, "जर कोणाला भारतीय संस्कृती आणि भारतीय महाकाव्यांबद्दल जाणून घेण्यात रस असेल, तर मला वाटते की ही एक चांगली सुरुवात असू शकते, जिथे त्यांना रामायणातील सर्वोत्तम भाग पाहायला मिळेल." ती पुढे म्हणाली, "एक धार्मिक ग्रंथ म्हणून, जर तुमची श्रद्धा असेल, तर तुम्ही आत्मपरीक्षण करू शकता. तुमच्यामध्ये कोणते चांगले आणि वाईट गुण आहेत हे तुम्ही पाहू शकता. तुम्ही कालांतराने स्वतःमध्ये सुधारणा करायला शिकू शकता. कारण रावण पूर्णपणे वाईट नव्हता. आपल्यातील रावणाला ओळखणे आणि कालांतराने त्यात बदल घडवणे महत्त्वाचे आहे."

हे ही वाचा

'मला चिंता वाटते, विजय...', रश्मिका मंदाना ट्रोलर्सवर संतापली! दिले सडेतोड उत्तर

सिनेमाच्या प्रमाोशनाच्या वेळी साई पल्लवीने चित्रपटाबद्दल भाष्य केले आणि रावणावरही प्रतिक्रिया दिली. अभिनेत्रीने रावणाच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते साईने अशी वक्तव्ये करू नयेत, तर काहींच्या मते साईला ट्रोल करू नये. ती 'आतल्या रावणाबद्दल', म्हणजेच आंतरिक दोषांबद्दल माध्यमांशी बोलताना वक्तव्य केले आहे. रावणाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, एक धार्मिक ग्रंथ म्हणून जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही तुमच्यामधील चांगले आणि वाईट काय आहे हे तुम्ही पाहिले पाहिजे आणि कालांतराने त्यातील काही वाईट गोष्टी सुधारणे गरजेचे आहे.

पुढे अभिनेत्री म्हणाली की, रावण हा पूर्णपण दुष्ट नाही म्हणूनच आपल्यामधील रावणाला ओळखणे आणि कालांतराने स्वत:मध्ये बदल घडवणे महत्त्वाचे आहे असे अभिनेत्रीने मिडीयासमोर वक्तव्य केले आहे. या अभिनेत्रीने केलेले वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे अभिनेत्रीवर टीका देखील केली जात आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES