SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

11 रुपये फी, नंतर 'स्टार मटेरियल नाही' म्हणत चित्रपटातून काढून टाकले; अशी बनली अभिनेत्री सुपरस्टार

सुपरस्टार आशा पारेख यांना एकदा 'स्टार मटेरियल' नसल्याचे कारण देत एका चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 02, 2026, 11:37 AM IST | Updated: Oct 02, 2026, 11:38 AM IST
Image Credit: Asha Parekh
Join


बॉलिवूड सुपरस्टार आशा पारेख यांनी अनेक सुपरस्टार सिनेमे दिले. त्यांच्यावर चित्रीत केलेली गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतात. आशा पारेख यांचा स्क्रीनवरील टायमिंग आणि वावर प्रेक्षकांना भुरळ घालतात. पण सिनेमात काम करण्याची संधी मिळवण्याआधी त्यांनाही खूप संघर्ष करावा लागला होता. एक वेळ होती त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी फक्त 11 रुपये मिळत होते. इतकंच नव्हे तर काहीच दिवसांत त्यांना तू स्टार मटेरियल नाहीस असं सांगून सिनेमातून काढून टाकले. या एका वाक्यामुळं आशा पारेख यांचे संपूर्ण आयुष्य बदलले.

आशा पारेख यांना जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी सांताक्रुझ येथे झाला होता. आशा पारेख यांना लहानपणापासून डान्सची आवड होती. आठ वर्षांच्या असताना त्यांनी शाळेत एका कार्यक्रमात डान्स केला होता.  त्यानंतर त्यांनी कथक आणि भरतनाट्यमची प्रक्षिशण घेतले. त्यांच्या कलेमुळंच त्या सिनेमात पोहोचल्या.

दिग्दर्शक विमल रॉय यांनी एका कार्यक्रमात आशा पारेख यांना त्यांनी बघितले. तेव्हा रॉय यांनी त्यांना बाल कलाकार म्हणून चित्रपटात घेतले. त्यांनी बार बेटी चित्रपटात काम केले. यापूर्वी त्यांनी 'मा', 'आसमान' आणि 'श्री चैतन्य महाप्रभू' यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. विजय भट्ट यांच्या 'गुंज उठी शहनाई' या चित्रपटात नायिका म्हणून करारबद्ध झाल्यावर आशा पारेख यांच्या करिअरला मोठा झटका बसला.

आशा पारेख यांना चित्रपटाची सायनिंग अमाउंट  ११ मिळाली होती. त्या चित्रपट मिळाल्यानंतर खूपच खुश होत्या. मात्र चित्रपटाचे शूटिंग झाल्यानंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. आशा पारेख यांनी म्हटलं होतं की, 'स्टार मटेरियल' नाही असं मला सांगण्यात आली. आणि माझ्या  जागी अमिताला घेण्यात आले. त्यावेळी हा माझ्यासाठी एक मोठा धक्का होता.

मात्र या सिनेमातून नकार मिळाल्यानंतर काही काळानंतर आशा पारेख यांचे नशीब पालटले. चित्रपट निर्माते नासिर हुसेन यांनी आशा यांना 'दिल देके देखो'साठी स्क्रीन टेस्टकरिता बोलावले. आशा पारेख यांनी टेस्ट दिली आणि त्यांना भूमिका मिळाली. 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी शम्मी कपूरसोबत काम केले. हा चित्रपट हिट ठरला आणि आशा पारेख एक आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारूपाला आल्या. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

आशा पारेख 1960 आणि 1970 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या. "जब प्यार किसीसे होता है," "तीसरी मंझिल," "लव्ह इन टोकियो," "मेरे सनम," "आये दिन बहार के," "उपकार," "कटी पतंग," "आँ मिलो सजना," "कारवां," आणि "मेरा गांव मेरा देश" यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची चर्चा झाली.. "कटी पतंग" मधील त्यांच्या अभिनयामुळे तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आशा पारेख यांनी फक्त चित्रपटात काम केले नाही त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही काम केले.

आशा पारेख यांनी त्यांनी टीव्हीसाठीही काम केले.  त्यांनी 'ज्योती' या गुजराती मालिकेचे दिग्दर्शन केले. त्यांनी 'कोरा कागज' सारख्या टीव्ही प्रकल्पांवरही काम केले. त्यांनी सिने आणि टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आणि 1998 ते 2001 या काळात त्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (सेन्सॉर बोर्ड) अध्यक्षा होत्या, हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.

पुरस्कारांबद्दल बोलायचे झाल्यास, आशा पारेख यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2002 मध्ये, त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि नंतर, भारत सरकारने 2020 च्या दादासाहेब फाल्के पुरस्कारासाठी त्यांची निवड केली, जो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES