'अशोक खरातने मला ओश्नो जल आणि चिंचोके दिले अन् पूजा...', अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा मोठा खुलासा, 'राजकीय सल्लाही...'
'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' या चित्रपटामुळे अभिनेत्री दिपाली सय्यद सध्या चर्चेत आहे. तिने अशोक खरातबद्दल मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली 'अशोक खरात माझ्या ऑफिसमध्ये आला होता.'
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अशोक खरातची चर्चा होते आहे. कारणही तसंच आहे, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' या चित्रपटामुळे...या चित्रपटातील अनेक कलाकारांचे चेहरे समोर आणि त्यांच्या भूमिका समोर आल्या आहेत. या चित्रपटात दिपाली सय्यद ही मुख्य अभिनेत्री आहे. तर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अशातच झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत दिपाली सय्यद यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत दिपाली सय्यद काय म्हणाल्यात?
या मुलाखतीत दिपाली सय्यद यांनी अशोक खरातबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्यात की, मी जेव्हा त्याला भेटले होते त्यावेळी मला तो हाच (अशोक खरात) व्यक्ती आहे,असं माहिती नव्हतं. तो माझ्या मुंबईच्या ऑफिसमध्ये दोन वर्षांपूर्वी एक कार्यकर्ता घेऊन आला होता. त्याने क्रीम रंगाची सफारी घातली होती. मी जेव्हा ऑफिसला पोहोचली तो आधीपासून बसलेला होता.
यावेळी त्याने मला पॉलिटिकल सल्लाही दिला. म्हणतो कसा, बाई तुझं काहीतरी चांगलं होणार. तुला काहीतरी पदबिद मिळणार, तू मोठी होशील. मला त्यावेळी त्याने चिंचोके आणि पाणी दाखवलं (ओश्नो जल) दाखवलं आणि म्हणला काहीतरी पूजा करावी लागणार वगैरे. आता मला असं वाटतं की ती गोष्ट मी तेव्हा अशीच सोडून टाकली.
त्या पुढे म्हणाल्यात की, जर माणसाला अशीच पदं मिळाला लागली असती तर झालंच. मग माणसाने मेहनतच का करायची? ज्यावेळी एखादा माणूस गुरू म्हणून तुम्हाला भेटायला येतो, तेव्हा आपण त्याला हडतूड करू शकत नाही. माझंही तेच झालं, मला तो कोण आहे माहिती नव्हतं. पण त्यानंतर मी कार्यकर्त्याला म्हणाले अशी लोकं आणत नका जाऊ भेटायला.
अशोक खरात अटकेत
नाशिकमधील सिन्नरमधील मिरगाव इथे शिवनिका संस्थानाच्या नावाखाली अशोक खरात हा धार्मिक विधी, जादूटोणा आणि दैवी शक्तीचा बनाव करत महिलांचे लैंगिक शोषण करायचा. मोठ्या उद्योजकांना लाखोंचा गंडा घातला आहे. त्यासोबत काळा पैसा पांढरा करण्याचाही गंभीर आरोप अशोक खरातवर आहे.