• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नागपूर
  • /चंद्रपूरमध्ये बालसुधारगृहातील धक्कादायक घटना! मुलींनी काच फोडली नंतर सुरक्षारक्षकाला धमकावलं अन्...; रात्री एकच खळबळ, सर्वच्या सर्व 6 मुली...

चंद्रपूरमध्ये बालसुधारगृहातील धक्कादायक घटना! मुलींनी काच फोडली नंतर सुरक्षारक्षकाला धमकावलं अन्...; रात्री एकच खळबळ, सर्वच्या सर्व 6 मुली...

चंद्रपूर शहरातील मुलींच्या बालसुधारगृहात धक्कादायक घटना घडली आहे. सहा मुली येथून पसार झाल्या होत्या. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 20, 2026, 18:18 IST|Updated: Nov 20, 2026, 18:32 IST
joinshare
चंद्रपूरमध्ये बालसुधारगृहातील धक्कादायक घटना! मुलींनी काच फोडली नंतर सुरक्षारक्षकाला धमकावलं अन्...; रात्री एकच खळबळ, सर्वच्या सर्व 6 मुली...
Image Credit: चंद्रपूरमध्ये बालसुधारगृहातून मुली पळाल्या (AI Photo)

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
चंद्रपूरमध्ये बालसुधारगृहातील धक्कादायक घटना! मुलींनी काच फोडली नंतर सुरक्षारक्षकाला धमकावलं अन्...; रात्री एकच खळबळ, सर्वच्या सर्व 6 मुली...

चंद्रपूरमध्ये बालसुधारगृहातील धक्कादायक घटना! मुलींनी काच फोडली नंतर सुरक्षारक्षकाला धमकावलं अन्...; रात्री एकच खळबळ, सर्वच्या सर्व 6 मुली...

2

4,4,4,4,4,4,4,4,4,6,6... कुशाग्र-तिलकची खेळी भारतासाठी वरदान! टी20 चे स्टार नेपाळविरुद्ध फेल

3

दाऊदसंदर्भातील धक्कादायक खुलासे! FBI एंजटने उघड केली नवी गुपितं, तीन नवीन ठिकाणंही झाली उघड, घराखालीच मुजरा अन् कोकेन...

4

लग्नाचे आमिष, 14 तरुणींसोबत शारीरिक संबंध अन् प्रायव्हेट व्हिडीओ...त्या सराईत आरोपीला भारतात आणण्यात CBI ला मोठं यश

5

'जर कोणी कारवाई थांबवायला फोन केला तर नाव जाहीर करणार,' अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पुणे आयुक्तांचा इशारा; रोज धडाडणार JCB

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

चंद्रपूर शहरातील मुलींच्या बालसुधारगृहातील एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. बालसुधारगृहातून तब्बल सहा मुलींनी पळ काढला होता. कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही मुली फरार झाल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागलं होतं. समुपदेशनासाठी असलेल्या एका मुलीने त्यांनी मदत केल्याचं उघड झालं आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर प्रशासनाची एकच धावपळ सुरु झाली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. अखेर हिंगणघाट येथून अवघ्या काही तासातच सहाही मुलींना ताब्यात घेण्यात आले.

नेमकं काय झालं?

चंद्रपूर शहरातील बालसुधारगृहात एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. बालसुधारगृहात समुपदेशनासाठी असलेल्या एका मुलीने काचेचा ग्लास फोडला. यानंतर काचेच्या तुकड्याच्या आधारे सुरक्षारक्षकांना धमकावत आपल्यासह सहा अल्पवयीन मुलींना भिंतीवरून उडी घेत पळून जाण्यास मदत केली. सुरक्षारक्षकाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुरुवारी रात्री झालेल्या या प्रकारानंतर घटनेचे गांभीर्य बघता चंद्रपूर पोलिसांनी सर्व शक्तीनिशी शोध मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर प्रमोद चौगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

तपासासाठी सहा पथकं

पोलिसांनी शहर व आसपासचे 35 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. याशिवाय सायबर शोध मोहीम आणि गोपनीय माहितीसह प्रत्यक्षदर्शींचाही मदत घेण्यात आली. मुलींचा शोध घेण्यासाठी एकूण सहा विविध पथके गठीत करण्यात आली होती. चंद्रपूर शहराच्या आसपासची रेल्वे स्थानके, बस स्टँड, मंदिरे, नदीकाठ येथे त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र काही सुगावा लागत नव्हात. 

दरम्यान, गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर सहा अल्पवयीन मुली वर्ध्यातील हिंगणघाट येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथकांनी माहितीची पडताळणी करून मुलींचा ठावठिकाणा निश्चित केला. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील नाईक यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्याशी समन्वय साधून सदर मुलींचा शोध घेण्यासाठी आवश्यक सूचना व निर्देश दिले. त्यानुसार समन्वय साधत या मुलींना ताब्यात घेण्यात आलं. चंद्रपूर येथून दोन पथके हिंगणघाटला रवाना करण्यात आली व त्यांच्यासोबत पुन्हा एकदा या सर्व मुली चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात आल्या आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Chandrapur