• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /लग्नाचे आमिष, 14 तरुणींसोबत शारीरिक संबंध अन् प्रायव्हेट व्हिडीओ...त्या सराईत आरोपीला भारतात आणण्यात CBI ला मोठं यश

लग्नाचे आमिष, 14 तरुणींसोबत शारीरिक संबंध अन् प्रायव्हेट व्हिडीओ...त्या सराईत आरोपीला भारतात आणण्यात CBI ला मोठं यश

लग्नाचे आमिष दाखवून 14 तरुणींसोबत शारीरिक संबंध ठेवणारा फरार आरोपी मोहम्मद माझिनला सीबीआयने परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात आणण्यात यश आलंय.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 20, 2026, 17:11 IST|Updated: Nov 20, 2026, 17:29 IST
joinshare
लग्नाचे आमिष, 14 तरुणींसोबत शारीरिक संबंध अन् प्रायव्हेट व्हिडीओ...त्या सराईत आरोपीला भारतात आणण्यात CBI ला मोठं यश
Image Credit: mohammad majin

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
लग्नाचे आमिष, 14 तरुणींसोबत शारीरिक संबंध अन् प्रायव्हेट व्हिडीओ...त्या सराईत आरोपीला भारतात आणण्यात CBI ला मोठं यश

लग्नाचे आमिष, 14 तरुणींसोबत शारीरिक संबंध अन् प्रायव्हेट व्हिडीओ...त्या सराईत आरोपीला भारतात आणण्यात CBI ला मोठं यश

2

'जर कोणी कारवाई थांबवायला फोन केला तर नाव जाहीर करणार,' अतीक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पुणे आयुक्तांचा इशारा; रोज धडाडणार JCB

3

पंढरपूर राजा भिंगे हत्या प्रकरणात नवीन वळण, 9 वर्षांपूर्वीच्या नगरसेवक मित्राच्या हत्येचा बदला? काय आहे इनसाईट स्टोरी?

4

अभिनेत्रीने वयाच्या 48 व्या वर्षी पतीसोबत केले दुसऱ्यांदा लग्न! शेअर केले खास फोटो

5

पंढरपुरातील राजाभाऊ भिंगे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; नऊ वर्षांपूर्वी मिरजेत कोयत्याने..., गुजरातपर्यंत पोहोचले पोलीस; तपासात धक्कादायक खुलासे

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्र पोलिसांना मोठं यश आलं आहे. एका फरार आरोपीला संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात आणण्यात यश आलंय. या आरोपीचं नाव मोहम्मद माजिन आहे. या नराधमाने लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 14 तरुणींचं लैंगिक शोषण केले. एवढंच नाहीतर त्यांचे मानसिक छळ करून त्यांना लाखोंचा गंडादेखील घातला आहे. या धक्कादायक कृत्यानंतर तो परदेशात फरार झाला होता. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI), परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून आज (20 नोव्हेंबर 2026) भारतात यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आलं.

महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरमध्ये काय नमूद?

महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरनुसार, आरोपी हा मुलींना पहिले प्रेम जाळ्यात अडकवायचा. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचा. त्याने असे एक नाही दोन नाही तब्बल 14 तरुणींसोबत हा भयानक खेळला. एवढंच नाहीतर त्याने या महिलांनाकडून 18 लाखांचा गंडा घातला होता. या प्रकरणात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. पण तो भारतातून फरार झाला होता. त्या आरोपीने या तरुणींचे खाजगी क्षणाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरु केल्यानंतर तोपर्यंत तो भारतातून परदेशात गेला होता.

त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीनुसार, सीबीआयच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो (एनसीबी), नवी दिल्लीने, इंटरपोलमार्फत आरोपीविरुद्ध रेड नोटीस जारी केलं होतं. त्यानंतर या कारवाईला अजून वेग आला होता. त्यानंतर इंटरपोलच्या आंतरराष्ट्रीय चॅनेलद्वारे आरोपीचे ठिकाण शोधमोहिम सुरू झाले आहेत. या शोध मोहीमेत युएईच्या अधिकाऱ्यांनी यश आलं आणि त्याला अटक करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन युएईच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला भारतात प्रत्यार्पणाची परवानगी दिल्यामुळे त्याचा भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. 

हेसुद्धा वाचा - पंढरपूर राजा भिंगे हत्या प्रकरणात नवीन वळण, 9 वर्षांपूर्वीच्या नगरसेवक मित्राच्या हत्येचा बदला? काय आहे इनसाईट स्टोरी?

त्यानंतर  महाराष्ट्र पोलिसांचे एक एस्कॉर्ट पथक त्याला अटक करण्यासाठी युएईमध्ये गेलं होतं. त्यांच्या ताब्यातून आरोपीला घेतल्यानंतर पोलीस पथक आरोपीसह विमानाने भारतातील कोचीमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झालेत. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या कारवाईमुळे महाराष्ट्र पोलिसांना हवा असलेला आरोपी देशात यशस्वीपणे परत आणण्यात मोठं यश मिळालं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime