इमर्जिंग आशिया कप 2026 मध्ये भारत अ संघाची आजपासून मोहिम सुरु आहे. टीम इंडिया या स्पर्धेमध्ये नेपाळविरुद्ध सामन्यामध्ये सुरुवात केली आहे. भारताच्या संघाची या पहिल्या सामन्यामध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. टीम इंडियाची सलामीवीर फलंदाज काही ओव्हर भारताची खेळी सांभाळली आणि पहिल्या तीन खेळाडूंचा भारताच्या संघाने लवकर विकेट गमावले. त्यानंतर भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा आणि आयुष बडोनी याचा विकेट भारताने गमावल्यानंतर कुमार कुशाग्र यांनी संघासाठी मोठी भागिदारी केली आणि संघाला अडचणीमधून बाहेर केले. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा कोण आहे कुमार कुशाग्र यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली, या सामन्यात नेपाळच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत संघाने तीन विकेट्स लवकर गमावले. त्यानंतर संघाचा कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्रने संघासाठी कमालीची खेळी खेळली आणि दोघांनीही शतक झळकावले. तिलक आणि कुशाग्रच्या जोडीने भारताच्या संघाला सावरलं आणि टीम इंडियासाठी मोठी धावसंख्या उभारण्याची वाटचाल सुरु आहे.
हे ही वाचा
वैभव आयुष बडोनी बाद झाला आणि मैदानावर संघाचा कर्णधार तिलक वर्मा आला, त्यानंतर लगेचच वैभव सूर्यवंशीची मोठी विकेट भारताच्या संघाने गमावली आणि संघाला मोठा धक्का बसला. त्यानंतर कुमार कुशाग्रने संयम दाखवला आणि कठीण काळामध्ये नेपाळविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याने या सामन्यात 62 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार तिलक वर्माने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने सावध फलंदाजी करत 75 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी या सामन्यामध्ये संघासाठी शतकीय भागिदारी केली आहे आणि हा लेख लिहीपर्यत दोघेही मैदानावर नाबाद खेळत आहेत.
62-ball FIFTY A solid rebuild act from Kumar Kushagra Updates https://t.co/r7KnQLPzIm #TeamIndia | #INDAvNEP | #RisingStarsAsiaCup https://t.co/456Vrz0j4e
— BCCI (@BCCI) November 20, 2026
नेपाळच्या गोलंदाजांनी अशाप्रकारे भारतीय फलंदाजी उद्ध्वस्त केली. भारतीय संघाने अवघ्या 42 धावांत तीन महत्त्वाच्या विकेट गमावल्या. यामध्ये दोन्ही सलामीवीर अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांचा समावेश होता. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीच्या या अपयशामुळे संघासमोर अडचणी निर्माण झाल्या.