'किंग'मधील दीपिका पादुकोणच्या ड्रेसवरुन वाद, थेट भाजप आमदाराने शाहरुखलाच दिला इशारा
चित्रपट प्रदर्शन झाला नसला तरीही शाहरुखचा किंग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याला कारण ठरलं
शाहरुख खानचा आगामी चित्रपट किंग प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटाचे गाणं तू मिल जाएमध्ये दीपिका पादुकोणच्या ड्रेसवरुन मोठा वाद पेटला आहे. दीपिका पादुकोणने गाण्यात भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यावरुनच दिल्लीच्या पटपडगंजचे भाजपा आमदार रविंदर सिंह नेगी यांनी आक्षेप घेतला आहे.
किंग चित्रपटातील या गाण्यातील दृश्याला सनातन धर्माशी जोडण्यात आलं आले. आमदार नेगी यांनी शाहरुख खानवर थेट निशाणा साधला आहे. त्याचबरोबर, आत्ताच्या आता गाण्यातून हे दृश्यात बदल केले नाही तर देशभरात विरोधात आंदोलन करण्याचा इशारा, देण्यात आला आहे.
रविंद्र सिंह नेगी यांनी आरोप केला आहे की, भगवा रंगाचा अशाप्रकारे वापर करणे हे सनातन धर्माला बदनाम करण्यासारखे आहे. त्यांनी म्हटलं की, दीपिका पदुकोण या प्रकरणात फक्त एक चेहरा आहे. तर, याच्या मागे शाहरुख खानसारखे लोकांचा कट आहे. इतकंच नव्हे तर, आमदाराने शाहरुख खानला जिहादी असंही म्हटलं आहे.
नेगी यांनी चित्रपट निर्मात्यांना इशारा देत म्हटलं आहे की, गाण्यात दाखवण्यात आलेले दृश्य बदलले पाहिजे. असं झालं नाही तर देशभरात चित्रपटाविरोधात आंदोलन करण्यात येईल. त्यांनी पुढे म्हटलं की, सनातन धर्माविरोधात कोणत्याही प्रकारची चेष्टा सहन केली जाणार नाही. त्यांनी दीपिकाचा ड्रेस आणि गाण्यावरही नाराजी दर्शवली आहे.
शाहरुख खानचा 2023 साली प्रदर्शित झालेला पठान चित्रपटदेखील चर्चेत आला आहे. या चित्रपटातील गाणे बेशरम रंगमध्ये दीपिका पादुकोण भंगव्या रंगाच्या बिकीनीत दिसली होती. त्यावेळी चित्रपटाला विरोध झाला होता. आता किंग चित्रपटातही भगवा रंगाच्या ड्रेसवरुन वाद पेटला आहे.