• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /सर्वोच्च न्यायालयाचा OBC आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; केंद्र सरकारला दिला धक्का

सर्वोच्च न्यायालयाचा OBC आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; केंद्र सरकारला दिला धक्का

'युनियन ऑफ इंडिया विरुद्ध रोहित नाथन' खटल्यात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. याच निर्णयासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका फेटाळली आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 06, 2026, 01:55 PM IST|Updated: Nov 06, 2026, 02:10 PM IST
joinshare
सर्वोच्च न्यायालयाचा OBC आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; केंद्र सरकारला दिला धक्का
Image Credit: केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला धक्का (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'किंग'मधील दीपिका पादुकोणच्या ड्रेसवरुन वाद, थेट भाजप आमदाराने शाहरुखलाच दिला इशारा

'किंग'मधील दीपिका पादुकोणच्या ड्रेसवरुन वाद, थेट भाजप आमदाराने शाहरुखलाच दिला इशारा

2

सर्वोच्च न्यायालयाचा OBC आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; केंद्र सरकारला दिला धक्का

3

कोकेनमुळे अडकला KKR चा माजी क्रिकेटर, 1 महिन्याची लागली बंदी

4

पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात तटकरेंचं मोठं विधान, अजित पवारांचा उल्लेख करत म्हणाले '10 तारखेला...'

5

2028पर्यंत सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थान देणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टने केंद्र सरकारला एक मोठा धक्का दिला आहे. केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने 11 मार्च रोजी दिलेला 'क्रिमी लेयर' निश्चित करण्याच्या निकषांसंदर्भातील निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणामध्ये याचिका फेटाळून लावताना, ओबीसी प्रवर्गातील 'क्रिमी लेयर' ठरवण्यासाठी पालकांचे वेतन आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न हा एकमेव किंवा मुख्य आधार असू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय.

त्या उमेदवारांच्या नियुक्तीचे निर्देश

सुप्रीम कोर्टाने क्रिमी लेयरचे निकष हे प्रामुख्याने सामाजिक स्थितीवर आधारित असायला हवेत, केवळ कुटुंबाच्या एकूण उत्पन्नावर नाही असं निरिक्षक नोंदवलं आहे. 11 मार्च रोजी याच प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळालेल्या आयएएस, आयपीएस, आयआरएसच्या उमेदवारांच्या नियुक्तीचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून चुकीच्या पद्धतीने नियुक्ती होत असल्याचा दावा करत रोखण्यात आलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

या लोकांना मोठा दिलासा

खरं तर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय 11 मार्च रोजी दिला होता. केंद्र सरकारने या नियमाच्या अंमलबजावणीसाठी वेळ मागितली होती आणि पुनर्विचार याचिका दाखल केली होती, परंतु न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ती फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे पीएसयू (PSU) म्हणजेच सरकारच्या मालकीच्या कंपन्या, बँका आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिमी लेयरच्या चुकीच्या व्याख्येमुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या ओबीसी उमेदवारांना या निकालामुळे न्याय मिळाला असल्याचं सांगितलं जात आहे.

मूळ निर्णयात सुप्रीम कोर्टाने काय म्हटले होते?

'युनियन ऑफ इंडिया विरुद्ध रोहित नाथन' खटल्यात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. कोर्टाने स्पष्ट केले होते की, 8 सप्टेंबर 1993 च्या मूळ कार्यालयीन नियमांनुसार, ओबीसी उमेदवाराचा 'क्रिमी लेयर' हा प्रामुख्याने त्याच्या पालकांच्या पदाच्या आणि नोकरीच्या सामाजिक स्थितीवर ठरवला गेला पाहिजे. केवळ कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाच्या आधारे आरक्षण नाकारता येणार नाही. 1993 च्या मूळ नियमावलीनुसार, जेव्हा क्रिमी लेयरसाठी वार्षिक उत्पन्न तपासले जाते, तेव्हा पालकांचे वेतन आणि शेतीचे उत्पन्न यातून पूर्णपणे वगळणे आवश्यक आहे. व्यवसाय, मालमत्ता अशा केवळ इतर स्त्रोतांचे उत्पन्न विचारात घ्यावे, असं कोर्टाने म्हटलं होतं.

हा भेदभावच; सुप्रीम कोर्टाचं निरिक्षण

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) 14 ऑक्टोबर 2004 रोजी एक स्पष्टीकरण पत्रक जारी केलं होतं ज्यामध्ये सार्वजनिक उपक्रम (PSUs), सरकारी बँका आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा समावेश चुकीच्या पद्धतीने 'क्रिमी लेयर' निश्चित करण्यासाठी केला जात होता. न्यायालयाने 2004 च्या या पत्रातील 'पॅरा 9' अवैध आणि बेकायदेशीर ठरवला. या परिच्छेदातील तरतूद 1993 च्या मूळ नियमांना डावलू शकत नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलेलं. सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणारे लाभ आणि सार्वजनिक उपक्रम (पीएसयू) किंवा बँकांमधील समतुल्य पदांवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना मिळणारे लाभ यात मोठा फरक केला जात होता. नोकरीची समतुल्यतानिश्चित न करता, पीएसयू आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना केवळ वेतनावरून क्रिमी लेयरमध्ये टाकणे हे घटनेच्या कलम 14, 15 आणि 16 चे उल्लंघन असून हा एक प्रकारचा 'भेदभाव' असल्याचं कोर्टाने स्पष्ट केले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Supreme court
india