• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /2028पर्यंत सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थान देणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

2028पर्यंत सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थान देणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

आश्रय योजनेतील 140 घरांचा शुभारंभ झालेला आहे. चावी वाटपाचे कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 06, 2026, 12:54 PM IST|Updated: Nov 06, 2026, 12:56 PM IST
joinshare
2028पर्यंत सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थान देणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Image Credit: Mumbai Safai Workers Ashray Scheme

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
2028पर्यंत सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थान देणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

2028पर्यंत सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थान देणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

2

बीडमध्ये वैभव चव्हाणचा मृतदेह सापडल्याने खळबळ! पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्र रॅकेट केलं होतं उघड, हादरवणारी ऑडिओ क्लिप

3

NCMC Card संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! लाखो ST प्रवाशांना फायदा; महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट

4

धक्कादायक! 7 वर्षाचा मुलगा आणि पत्नीसह तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं, संपूर्ण शहरभर फेकले 7 जणांचे मृतदेह; पोलीस हादरले

5

दागिने खरेदीची सुवर्णसंधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आश्रय कक्ष, टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्यांचे वितरणाचा कार्यक्रम आज पार पडला. कुलाबा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली आहे. 2028 पर्यंत सगळ्यांना कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थान उपलब्ध होईल,असं अश्वासन त्यांनी दिलं आहे.

कुलाबा येथे आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'आश्रय योजनेच्या घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडतोय. आज सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस अतिषय महत्त्वाचा आहे. कारण बीएमसीने आज अतिषय उत्तम कामगिरी केली आहे. वर्षानुवर्षे दीडशे चौरस फुटाच्या पडक्या घरात राहत होते. तिथे सामूहिक स्वच्छतागृहाची व्यवस्था होती. कोणतीही सोय नव्हती. अशा ठिकाणी राहणारे. आमचे सर्व मुंबई महानगपालिकेचे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवणारे कर्मचारी यांनी 300 चैरस फुटाचे घर त्यांना मिळाले आहे.'

अतियश सुंदर इमारत त्यांनी बांधली आहे. अशाप्रकाचे आधी मोठ्या खासगी इमारत व्हायच्या. पहिल्यांदा पालिकेची इमारत अशाप्रकारच्या टेक्नलॉजीने तयार झाली आहे या इमारतीचे 100 वर्षाचे आयुष्य आहे. 10 वर्षांपर्यंतचा मेंटेनन्स विकासक देणार आहे. त्यामुळे रहिवाशांना 10 वर्षे फक्त राहायचे आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आपले जे सफाई कर्मचारी सर्वांचं आरोग्य उत्तम ठेवतात. ते स्वतः अस्वच्छेतेत काम करुन मुंबई स्वच्छ ठेवतात. पण त्यांचं जीवन अतिषय खुराड्यासारख्या अशा घरांमध्ये व्यतित होत होतं. आशियातील सर्वात मोठ्या पालिकेचे कर्मचारी अशा पद्धतीने राहतात ही काही भूषणावह गोष्ट नव्हती. पण आज ही निवासस्थाने पाहिल्यानंतर आम्हालाही समाधान झाले आहे. मला विश्वास आहे की, 2028 पर्यंत सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सेवा सेवानिवासस्थान उपलब्ध होईल. ते निवृत्त झाल्यानंतर जर त्यांचा मुलगा त्या ठिकाणी कामाला लागला तर घर त्याच्या नावे ट्रान्सफर होतं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Devendra Fadnavis
Mumbai
Mumbai News