• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /NCMC Card संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! लाखो ST प्रवाशांना फायदा; महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट

NCMC Card संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! लाखो ST प्रवाशांना फायदा; महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट

ही घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 06, 2026, 12:17 PM IST|Updated: Nov 06, 2026, 12:31 PM IST
joinshare
NCMC Card संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! लाखो ST प्रवाशांना फायदा; महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट
Image Credit: लाखो प्रवाशांना होणार फायदा (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
बीडमध्ये वैभव चव्हाणचा मृतदेह सापडल्याने खळबळ! पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्र रॅकेट केलं होतं उघड, हादरवणारी ऑडिओ क्लिप

बीडमध्ये वैभव चव्हाणचा मृतदेह सापडल्याने खळबळ! पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्र रॅकेट केलं होतं उघड, हादरवणारी ऑडिओ क्लिप

2

NCMC Card संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! लाखो ST प्रवाशांना फायदा; महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट

3

धक्कादायक! 7 वर्षाचा मुलगा आणि पत्नीसह तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं, संपूर्ण शहरभर फेकले 7 जणांचे मृतदेह; पोलीस हादरले

4

दागिने खरेदीची सुवर्णसंधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव

5

IND vs NZ: संपूर्ण सीरिजमधून बाहेर पडला स्टार फलंदाज, प्रॅक्टिस दरम्यान झालेली दुखापत, संघाचं टेन्शन वाढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत शासनाच्या निर्देशानुसार समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या सवलतींचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्या व सूचनांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबर 2026 पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे 1 कोटी 10 लाख कार्डांची नोंदणी व वितरण करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचली नसल्याने त्या अद्याप स्मार्ट कार्डपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून ही शिबिरे राबविण्यात येणार आहेत. या विशेष मोहिमेद्वारे 31 डिसेंबर 2026 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची 100 टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे.

कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ

महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या आणि ग्रामीण भागात कार्ड नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्यांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड नसतानाही 7 नोव्हेंबर 2026 पासून 31 डिसेंबर 2026 पर्यंत एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कार्ड नोंदणी अद्याप पूर्ण न झालेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मुदतवाढीच्या कालावधीत सर्व पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

परिवहन मंत्र्यांचे आवाहन

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. विशेष नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड पोहोचविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
MSRTC
Maharashtra News
Maharashtra Tourism