SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बॉलिवूडमध्ये खळबळ! तुषार कपूरनंतर आता आयुष्मान खुरानाला धमकीचा मेसेज, लॉरेन्स गँगचा उल्लेख

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्यांचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाला धमकीचा ऑडिओ मेसेज आला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 04, 2026, 12:53 PM IST | Updated: Nov 04, 2026, 12:55 PM IST
Image Credit: Bollywood actor Ayushmann Khurrana
Join

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूडकरांनी धसका घेतला आहे. अनेक कलाकारांनी आपल्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे. मात्र अद्यापही कलाकारांना मिळणाऱ्या धमकीचे सत्र थांबले नाहीये. अभिनेता तुषार कपूर  याला धमकी मिळाल्यानंतर आता अभिनेता आयुष्मान खुरानालादेखील धमकीचा ऑडिओ मेसेज आला आहे. लॉरेन्स गँगकडून ही धमकी आल्याचा दावा करण्यात येत असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर आता अभिनेता आयुष्मान खुरानालाही धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष्मान खुरानाला धमकीचा ऑडिओ क्लिप पाठवण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची केल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, धमकी देणाऱ्या व्यक्तीने ऑडिओमध्ये सांगितलेले नाव आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील संबंधित आरोपीचा आवाज यांची पडताळणी केली जात आहे. आवाजाचे नमुने जुळतात का, याचा तपास पोलीस करत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता तुषार कपूरलाही धमकीचा ऑडिओ मेसेज मिळाल्याची माहिती समोर आली होती. या मेसेजमध्ये धमकी देणाऱ्याने स्वतःची ओळख हॅरी बॉक्सर अशी सांगितली होती. मात्र, प्राथमिक तपासात हा ऑडिओ बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बॉलिवूड कलाकारांना धमक्या देणे, त्यांची रेकी करणे आणि दहशत निर्माण करण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा तपास करत आहे.

तुषार कपूरलाही धमकीचा मेसेज

बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर यांना कथितरित्या एक फोन आला, ज्यामध्ये फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सर म्हणून सांगितली आणि 5 कोटी (50 दशलक्ष रुपये) रुपयांची खंडणी मागितली. अभिनेत्याने या प्रकरणाची माहिती मुंबई पोलिसांना दिली, ज्यांनी नंतर हा तपास खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखेकडे वर्ग केला. गुन्हे शाखेच्या तांत्रिक पथकाने धमकीच्या फोनमधील ऑडिओ रेकॉर्डिंग तपासले असून, त्यांच्या डेटाबेसमधील हॅरी बॉक्सरच्या अधिकृत ऑडिओ नमुन्यांशी आवाजाची जुळवणी करत आहेत. वरिष्ठ पोलीस सूत्रांनुसार, हे नमुने जुळले नाहीत, त्यामुळे हा फोन बनावट होता किंवा कोणीतरी धमकावण्यासाठी टोळीच्या नावाचा वापर केला होता, असा संशय बळावला आहे. पोलीस आता हे ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. या प्रकरणात अद्याप कोणतीही एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. तुषार कपूर यांनी सुमारे आठवडाभरापूर्वी ही तक्रार दाखल केली होती.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES