• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /सर्वात मोठ्या IT कंपनीत नोकरकपात, पण तरीही कर्मचाऱ्यांची चांदी; फ्री मॅकबुक, अन् एक वर्षासाठी...

सर्वात मोठ्या IT कंपनीत नोकरकपात, पण तरीही कर्मचाऱ्यांची चांदी; फ्री मॅकबुक, अन् एक वर्षासाठी...

कॅनव्हात काम करणाऱ्या नोकरदांवर कर्मचारी कपातीची तलवार लटकत आहे. मात्र नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 04, 2026, 02:39 PM IST|Updated: Nov 04, 2026, 02:41 PM IST
joinshare
सर्वात मोठ्या IT कंपनीत नोकरकपात, पण तरीही कर्मचाऱ्यांची चांदी; फ्री मॅकबुक, अन् एक वर्षासाठी...
Image Credit: Canva Layoffs

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धनत्रयोदशीला शुक्र करणार 5 राशींच्या लोकांना मालामाल! धन, समृद्धी, भौतिक सुखसोयी आणि ऐश्वर्य देणार

धनत्रयोदशीला शुक्र करणार 5 राशींच्या लोकांना मालामाल! धन, समृद्धी, भौतिक सुखसोयी आणि ऐश्वर्य देणार

2

ODI मध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात, कोहलीने ठोकले अर्धशतक! वाचा सामन्याचा अहवाल

3

5 जणांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर, शस्त्र हिसकावताना झटापट अन्....

4

मुंबईकरांनो, 'या' भागात फटाके फोडाल तर दिवाळी जाईल तुरुंगात; 2 डिसेंबरपर्यंत आदेश लागू!

5

सर्वात मोठ्या IT कंपनीत नोकरकपात, पण तरीही कर्मचाऱ्यांची चांदी; फ्री मॅकबुक, अन् एक वर्षासाठी...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कॅनव्हामध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होण्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनी आर्टिफिशियल इंटेलीजेंस (AI) चा वाढता खर्च आणि ऑटोमेशनमुळं काही बदल करण्यात येणार आहे. यामुळं 22 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा सामना करावा लागणार आहे. या कपातीमुळं साधारण 1,271 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे.

कॅनव्हाचे सीईओ मेलनी पार्किंसकडून कर्मचाऱ्यांना मेमो ईमेल पाठवण्यात आला आहे. सीईओ मेलनी यांनी म्हटलं की, कंपनी सध्या अडचणीत आहे. मेमोमध्ये त्यांनी लिहिलं आहे की,यामुळं लोकांना होणारा त्रास आणि मनस्पात यामुळं मी माफी मागतो. कंपनीने 37 देशातील साधारण 5700 जणांना कामावरुन काढून टाकले आहेत. यात भारतातील कर्मचारीदेखील आहेत. तर, इतर कोणत्या देशातील कर्मचारी आहेत, याची यादी मात्र अद्याप समोर आलेली नाही.

अलीकडेच अनेक चेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. मात्र कॅनव्हाने केलेल्या नोकरकपातीची मोठी चर्चा होतेय. नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांना फ्री मॅकबुक आणि 6 महिन्याचा पगार देणार येण्यात येणार आहे. तर, एक वर्षासाठी मोफत प्रिमीयम लिंक्डइन सपोर्ट मिळणार आहे.

एखादी कंपनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढते. तेव्हा त्याला सेवरेंस पॅकेज दिलं जातं. या पॅकेजअंतर्गंत काही महिन्यांचा पगार दिला जातो. मात्र कॅनव्हाने घेतलेला निर्णयाची सगळीकडे चर्चा आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना खास सुविधादेखील दिल्या आहेत. यात मोफत मॅकबुक देण्यात आला आहे. तसंच, नोकरी गमावणाऱ्या 1271 कर्मचाऱ्यांना कंपनीने मॅकबुक सोबत नेण्याची परवानगी दिली आहे.

कॅनव्हात नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना एक मोफत मॅकबुक आणि लिंक्डइन प्रीमियमचे एक वर्षाचे सदस्यत्व देखील देईल. यामुळे कर्मचाऱ्यांना करिअर मार्गदर्शन आणि मुलाखतीची तयारी करणे शक्य होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या रिझ्युमेचा रिव्ह्यू करण्यासाठी आणि मुलाखतीचा सराव करण्यासाठी मदत करण्याकरिता, ती आपली टॅलेंट ॲक्विझिशन टीम देखील तैनात करेल. यामुळे त्यांना त्यांची पुढील नोकरी शोधण्यात मदत होईल.

कॅनव्हाच्या कर्मचारी कपातीमुळे ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल त्यांना पगार, आरोग्यसेवा आणि इतर आर्थिक मदत दिली जाईल. सीईओने म्हटलं की, प्रभावित कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व लाभांसह किमान सहा महिन्यांचा पगार मिळेल. त्यांनी पुढे असेही सांगितले की, ही सेवा कर्मचारी कोणत्याही देशात राहत असले तरी, सर्व कर्मचाऱ्यांसाठी असेल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Business News
Auto News
Technology News