वैदिक ज्योतिषशास्ज्ञानुसार संपत्तीचा कारक शुक्राचे दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी गोचर होणार आहे. हा अतिशय सुंदर आणि दुर्मिळ योग जुळून आला आहे. शुक्रवार, धनत्रयोदशी आणि शुक्र ग्रहाचे गोचर होणार आहे. 6 नोव्हेंबर 2026 शुक्रवारी शुक्र तूळ राशीतून कन्या राशीत गोचर करणार आहे. शुक्र हा धन, समृद्धी, भौतिक सुखसोयी आणि ऐश्वर्याचा कारक आहे. शुक्र ग्रह त्यानंतर 14 नोव्हेंबरला पहाटे 5.57 वाजता मार्गी होणार आहे. त्यामुळे याचा परिणार अधिक भाग्यशाली आणि सकारात्मक ठरणार आहे. शुक्र कन्या राशीत 22 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. चला मग जाणून घेऊयात कोणत्या राशीसाठी तो अधिक सकारात्मक ठरणार आहे.
या राशीच्या लोकांना शुक्र गोचरचा सकारात्मक लाभ होणार आहे. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखसोयी वाढणार आहे. या काळात तुम्ही एक मौल्यवान वस्तूची खरेदी करणार आहात. एवढंच नाहीतर नोकरदार लोकांना कंपनीकडून महागडे दिवाळीभेट किंवा बोनस मिळणार आहे. काही लोकांना एखादी जबरदस्त ऑफर मिळणार आहे. वैयक्तिक आयुष्यातही आनंदच आनंद असणार आहे.
या लोकांसाठी शुक्र गोचर आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे. तुमचा अडकलेला निधी तुम्हाला परत मिळणार आहे. दिवाळीत मोठा बोनस किंवा मौल्यवान भेटवस्तू या काळात मिळणार आहे. तर व्यवसायिकांवरील मंदीचे सावट दूर होऊन आता प्रगतीची संधी प्राप्त होणार आहे. एक चांगला करार आणि व्यवसायात वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही शुक्र गोचर यशाचे दरवाजे उघडणार आहे.
या लोकांना दिवाळीत मोठे लाभ मिळणार आहे. तुम्हाला अनपेक्षित ठिकाणाहून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. व्यावसायिकांना एखादा मोठा करार करणार आहात. करिअरमध्ये प्रगतीचे दरवाजे उघडणार आहे. नातेसंबंधात जवळीक वाढणार आहे.
या लोकांसाठी शुक्र गोचर बँक बॅलेन्स घेऊन आला आहे. तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. जमीन खरेदीचा सुवर्ण योग जुळून येणार आहे. तर मालमत्तेमध्ये आर्थिक फायदा होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक लाभाचा ठरणार आहे. तुमची जीवनशैली सुधारणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)