भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने सहज विजय मिळवला. या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये कमालीची कामगिरी भारतीय गोलंदाजांची पाहायला मिळाली तर दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. भारताच्या संघाने डीएलएस पद्धतीने या सामन्यामध्ये 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पाच सामन्याची मालिका होणार आहे, या मालिकेची टीम इंडियाने विजयी सुरुवात केली आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु झालेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत 40.2 ओव्हरमध्ये संपूर्ण संघ सर्वबाद झाला. न्यूझीलंडच्या संघाला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 185 धावांवर गुंडाळलं, प्रत्युत्तरात जेव्हा टीम इंडिया टार्गेट चेझ करत होते त्यावेळी भारताच्या संघ फलंदाजी करत असतात, मध्येच पावसाला सुरुवात झाली. अंपायरने डीएलएस मेथडनुसार सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भारताच्या संघाला 167 धावांचे लक्ष्य देण्यात आले.
हे ही वाचा
भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर टीम इंडियासाठी अर्शदीप सिंगने 4 विकेट्स नावावर केले. या सामन्यामध्ये सर्वात प्रभावी कामगिरी गोलंदाजांमध्ये अंशुल कंबोजने केली, त्याने या सामन्यामध्ये 10 ओव्हर टाकले यामध्ये त्याने फक्त 22 धावा देत 2 विकेट्स नावावर केले. टीम इंडियाचा युवा गोलंदाज गुरनुर ब्रार याने संघासाठी 3 विकेट्स घेतले, भारताच्या या भेदक वेगवान गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचे फलंदाज पूर्णपणे फेल झाले.
What a start to the ODI series #TeamIndia clinch a convincing win in Auckland to go 1-0 up Updates https://t.co/iZN2Y53Nur #NZvIND https://t.co/jXSglCUEzN
— BCCI (@BCCI) November 4, 2026
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने संघासाठी कमालीची शतकीय भागिदारी केली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याने संघासाठी 37 धावांची खेळी खेळली. तर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने संघासाठी अर्धशतक झळकावले. त्याने या सामन्यामध्ये 51 चेंडूमध्ये 74 धावा केल्या, यामध्ये त्याने 1 षटकार आणि 14 चौकार मारले. केएल राहुल आणि नमन धीर हे दोघेही नाबाद राहिले.