गुवाहाटीमधील 'हॉटेल बिलास' येथे 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेत सहभागी असल्याचा आरोप असलेला घनकांत गोगोई याचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. आसामच्या शिवसागर जिल्ह्यात नेत असताना पोलिसांच्या गोळीबारात तो ठार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक पापोरी चेटिया यांनी बुधवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसागर जिल्ह्यातील फुलपनिचिगा येथे नैसर्गिक विधीसाठी गोगोईला वाहनातून खाली उतरवण्यात आले होते, तेव्हा त्याने एका पोलीस अधिकाऱ्याचे सर्व्हिस पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर, मंगळवारी गोगोईला मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले होते.
ANI ने चेटिया यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तपास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक देबाशिष शर्मा यांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न गोगोईने केला. एसएसपी (SSP) यांनी सांगितले की, झटापटीदरम्यान दोन ते तीन राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यापैकी दोन गोळ्या पोलीस वाहनाला लागल्या. यावेळी शर्मा यांना दुखापत होऊ नये या हेतूने त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या सर्व्हिस पिस्तूलातून गोळीबार केला, असे त्यांनी सांगितले.
VIDEO | Guwahati hotel firing: Sivasagar SSP Papori Chetia visits encounter site where prime accused Ghanakanta Gogoi was killed in a police encounter. #AssamNews #SivasagarEncounter (Full video available on PTI Videos - https://t.co/d8jp61yd2p) https://t.co/nRyTcmG2iy
— Press Trust of India (@PTI_News) November 4, 2026
"तो एक प्रशिक्षित व्यावसायिक नेमबाज असल्याने, त्याने आमच्या तपास अधिकाऱ्याचे सर्व्हिस पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तीन राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या. पुढील हल्ला रोखण्यासाठी, सोबत असलेल्या एका पोलीस सुरक्षा अधिकाऱ्याला (PSO) स्वतःच्या शस्त्रातून प्रत्युत्तरदाखल गोळीबार करावा लागला. यात आरोपी जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेले असता, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले," अशी माहिती चेटिया यांनी दिली आहे.
एसएसपी (SSP) यांच्या माहितीनुसार, रुग्णालयात नेलं जात असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान शर्मा यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | Sivasagar, Assam: Ghanakanta Gogoi, allegedly involved in the shooting deaths of five people in Guwahati, dies after being injured in a police firing incident in Sivasagar. SSP Papori Chetia says, "While transporting one wanted accused of Sivasagar Police Station... he requested for a nature's call and then in this area he was taken out of the vehicle for that. Because he is a trained professional shooter, so he tried to snatch the service pistol of our officer who is an investigating officer also. And during that scuffle, three rounds of bullets have been fired... and to prevent further assault, one of the PSO had to fire back from his service weapon and in that the accused was also injured and when he was brought to the hospital he was declared dead..." (03.11)
— ANI (@ANI) November 4, 2026
ही घटना 26 ऑक्टोबर रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली. हॉटेलमध्ये पोहोचलेल्या पोलिसांना रिसेप्शन परिसरात चार मृतदेह सापडले होते आणि प्रवेशमार्गावर दोन जखमी व्यक्ती सापडल्या होत्या. दोन्ही जखमींना गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. दुसऱ्या व्यक्तीवर अजूनही उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वादातून गोगाईने भराली कुटुंबावर गोळ्या झाडल्या असाव्यात.