SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाटकातील अचानक एक्झिटनंतर केतकी-रोहनने थेट निर्मात्यांचा मेसेजच वाचून दाखवला, लीना भागवतांच्या आरोपांवर उत्तर देत म्हणाले, 'दीड हजारांसाठी...'

रंगभूमीवरील आमने-सामने या नाटकाचा वाद विकोपाला गेला आहे. कलाकारांना तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 29, 2026, 08:09 AM IST | Updated: Oct 29, 2026, 08:52 AM IST
Image Credit: Aamne Saamne Natak Controversy
Join

मानधनवाढ मागितल्यामुळं आमने-सामने नाटकातून तडकाफडकी काढून टाकल्याचा आरोप अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांनी केला होता. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी नाटकाच्या निर्मात्यांवर आरोप केला होता. त्यानंतर या नाटकाचे निर्माते आणि कलाकार लीना भागवत आणि मंगेश कदम यांनीही दोघांना प्रत्युत्तर देणारा व्हिडिओ केला होता. आता आमने-सामने आरोपांवर अभिनेता रोहन गुजर याने आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत आमच्या बाजूने पूर्णविराम असं म्हटलं आहे.

रोहन गुजर आणि केतकी विलास यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "नमस्कार आम्ही रोहन गुजर आणि केतकी विलास.... आम्ही आमच्या निर्मात्यांचा व्हिडिओ पाहिला. त्या खालच्या कमेंट्स वाचल्या. आम्ही त्यांच्या नाण्याची दुसरी बाजू ऐकली. पण ती बाजू मांडत असताना अनावधानाने, चुकून किंवा सोयीस्कर रित्या काही मुद्दे आले नाहीत. ते मांडण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करत आहोत. यानंतर आम्हाला सुद्धा कुठलाही प्रकारचा व्हिडिओ करण्याची इच्छा नाही. आमच्या निर्मात्यांनी तिसरी मानधन वाढ हे जितक्या ठाशीव पणे सांगितलं तितक्या ठाशीवपणे त्यांनी हे नाही सांगितलं की आठ वर्षातली तिसरी मानधन वाढ! आता असा समज झाला आहे की एका वर्षातली तिसरी मानधन वाढ पण ते तसं नाहीये."

"आठ वर्षांनंतर मानधन वाढ म्हणजेच ऍव्हरेज काढायला गेलो तर अडीच पावणेतीन वर्षानंतर एक मानधन वाढ. पहिली मानधन वाढ आमची झाली ती चार वर्षानंतर जी अत्यंत किरकोळ होती हे स्वतः निर्मात्यांनी मान्य केलं. दुसरी मानधन वाढ झाली ते सहा वर्षांनी... त्यात मध्ये आमचं नाटक एकदा बंद पडलेलं ते नव्याने सुरू झालं त्यानंतर हाउसफुल प्रयोग चार महिने सुरू झाले आणि मग आम्ही मानधन वाढीचा प्रस्ताव मांडला. या सहा वर्षांच्या हिशोबाने जेवढी बेसिक इन्क्रिमेंट आम्हाला मिळायला हवी तो प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवला ते सगळे मेसेजेस आमच्याकडेही आहे. ते व्हिडिओमध्ये म्हणाले की आम्ही त्यांच्या मागण्या सहज मान्य केल्या ते चुकीचं होतं. मी त्यांचा मेसेज वाचून दाखवते, त्यांचं म्हणणं होतं की, निर्माता म्हणून मी स्वतःच्या मनाला मुरड घालून मी ही वाढ करत आहे असो... म्हणजेच मुरड घालून मनाविरुद्ध! ही मानधन वाढ सुद्धा त्यांनी त्यांच्या मनापासून केलीच नव्हती."

 

 

पुढे त्यांनी म्हटलं की, " तिसरी मानधन वाढ आणि एका वर्षानंतर आता आम्ही मागत होतो. या सात वर्षात कधीच आमचे निर्माते स्वतःहून आपलं नाटक आता छान चालू आहे प्रयोग हाउसफुल होत आहेत म्हणून आपण तुमचा मानधन वाढवूया असं कधीच म्हणाले नाहीत. आमच्याकडे आणखी एक मेसेज आहे ज्यामध्ये आम्हाला निर्मात्यांनी सांगितले की जर उद्या नाटकाचे बुकिंग उतरलं तर आम्ही मानधनाच्या पाकिटाचा फेरविचार करू. आम्ही ते मान्य केलं... आम्ही कमी पाकिटात नाटक करायला तयार होतो कारण आम्हाला ते नाटक शेवटपर्यंत करायचं होतं."

"लॉकडाऊन मध्ये 50% क्षमतेमध्ये प्रयोग सुरू होते तेव्हा त्यांनी आम्हाला विनंती केलेली ऑडियन्स 50% आहे तर आम्ही पाकीट सुद्धा तेवढंच देऊ. आम्ही त्यासाठी लगेच तयार झालो, आम्ही 50% मानधन घेऊन काम केलं होतं. आम्ही जर दीड हजार मागत असू ते पण जे सात वर्ष त्यांच्यासोबत काम करत आहोत तर ही खूप मोठी कमिटमेंट आहे. आम्ही इमाने इतबाने सात वर्ष तुमच्या सोबत एक टीम म्हणून काम करत आहोत तर ते दीड हजार तुम्हाला खूप मोठे वाटतात. तुम्ही त्या दीड हजारासाठी आम्हाला तडका फडकी कुठलीही पूर्वकल्पना न देता रिप्लेस करता या गोष्टीचा आम्हाला वाईट वाटत नसेल तर आम्ही काय बोलणार. आम्हाला या गोष्टीचं त्रास होत आहे की जिथे आम्ही इतकं मन लावून काम केलं ज्या लोकांसोबत आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहिलो पण जेव्हा चांगले दिवस आले तेव्हा आम्हाला खूप वाईट पद्धतीने बाजूला केलं गेलं...", असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES