बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणी वाढल्या आहेत, अभिनेत्री नोरा फतेही हिला 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये तिचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित एका फसवणूक प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला समन्स बजावण्यात आले आहे. दिल्लीमधील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात ती हजर होणार आहे, मागील काही काळापासून सुकेश चंद्रशेखर याच्याशी अभिनेत्री नोरा फतेही हिचे देखील नाव जोडले जात होते आता या प्रकरणावर पुन्हा मोठी अपडेट समोर आली आहे, यासंदर्भात सविस्तर प्रकरण काय जाणून घ्या.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित प्रकरणामध्ये अभिनेत्री नोरा फतेही न्यायालयामध्ये हजर राहणार आहे. अभिनेत्री नोरा फतेही ही या प्रकरणामध्ये सरकारी साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर होणार आहे. या प्रकरणावर मोठी अपडेट अशी आहे की, तिसऱ्या पुरवणी आरोपपत्रात तिचे नाव साक्षीदार म्हणून नमुद करण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याभोवतीचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग आणि खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगात आहे. अभिनेत्रीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती यावेळी तिने हे आरोप फेटाळले होते, त्यानंतर तिची आता सरकारी साक्षीदार म्हणून निवड करण्यात आली आहे.