ACC Men’s U19 Asia Cup 2026 : एसीसी पुरुष अंडर 19 आशिया कप 2026 या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. 5 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर आणि राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड या दोघांना टीम इंडियात स्थान मिळालं आहे. तर यंदा अंडर 19एशिया कपसाठी टीम इंडियाचं कर्णधारपद उत्तराखंडचा खेळाडू लक्ष्य रायचंदानीला मिळालं आहे. या संघात यशोवर्धन सिंगचाही समावेश आहे, जो फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीमध्ये प्रभावी कामगिरी करतो. ज्या खेळाडूंनी अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध सामने खेळले होते, त्यांची निवड 19 वर्षांखालील आशिया कपसाठीच्या संघात करण्यात आली आहे.
भारताचा पुरुष अंडर 19 संघ :
लक्ष्य रायचंदानी, आर्यवीर सहवाग, वीके विनीत, यशोबर्धन सिंह, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनल चौहान, अन्वय द्रविड़, रजत बघेल, वी. यशवीर, आर्यन सवसानी, मोहित उल्वा, काव्य पटेल, शाविन विनोद और इशान सूद.
टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये :
टीम इंडियाला एसीसी पुरुष अंडर 19 आशिया कप 2026 मध्ये यूएई, नेपाळ, पाकिस्तान सोबत ग्रुप A मध्ये ठेवण्यात आलं आहे. तर ग्रुप B मध्ये बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, मलेशिया हे संघ आहेत. यापैकी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, जी 12 नोव्हेंबर रोजी होईल. अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.
भारताचे ग्रुप स्टेजचे सामने कधी?
भारत विरुद्ध नेपाळ : 6 नोव्हेंबर
भारत विरुद्ध पाकिस्तान : 8 नोव्हेंबर
भारत विरुद्ध यूएई : 10 नोव्हेंबर
भारताकडे बदला घेण्याची संधी :
भारतीय संघ मागच्यावेळी अंडर 19 आशिया कपमध्ये फायनल सामन्यात पराभूत झाला होता. त्यामुळे पाकिस्तानने दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. भारत हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी आतापर्यंत आठ वेळा 'अंडर-19 आशिया कप' जिंकला आहे. भारतीय संघ 1989, 2003, 2012, 2013-14, 2016, 2018, 2019 आणि 2021 मध्ये विजयी ठरला होता. बांगलादेशने ही स्पर्धा दोनदा जिंकली आहे, तर अफगाणिस्तानने एकदा विजय मिळवला आहे.