नोरा फतेहीच्या अडचणींमध्ये वाढ, खंडणी प्रकरणात अभिनेत्रीला न्यायालयाचे समन्स
मागील काही काळापासून सुकेश चंद्रशेखर याच्याशी अभिनेत्री नोरा फतेही हिचे देखील नाव जोडले जात होते आता या प्रकरणावर पुन्हा मोठी अपडेट समोर आली आहे, यासंदर्भात सविस्तर प्रकरण काय जाणून घ्या.
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणी वाढल्या आहेत, अभिनेत्री नोरा फतेही हिला 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये तिचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित एका फसवणूक प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला समन्स बजावण्यात आले आहे. दिल्लीमधील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात ती हजर होणार आहे, मागील काही काळापासून सुकेश चंद्रशेखर याच्याशी अभिनेत्री नोरा फतेही हिचे देखील नाव जोडले जात होते आता या प्रकरणावर पुन्हा मोठी अपडेट समोर आली आहे, यासंदर्भात सविस्तर प्रकरण काय जाणून घ्या.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित प्रकरणामध्ये अभिनेत्री नोरा फतेही न्यायालयामध्ये हजर राहणार आहे. अभिनेत्री नोरा फतेही ही या प्रकरणामध्ये सरकारी साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर होणार आहे. या प्रकरणावर मोठी अपडेट अशी आहे की, तिसऱ्या पुरवणी आरोपपत्रात तिचे नाव साक्षीदार म्हणून नमुद करण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याभोवतीचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग आणि खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगात आहे. अभिनेत्रीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती यावेळी तिने हे आरोप फेटाळले होते, त्यानंतर तिची आता सरकारी साक्षीदार म्हणून निवड करण्यात आली आहे.
हे ही वाचा
इंटीमेट सीन करण्याआधी या अभिनेत्रीला डायरेक्टरने पाजली दारु! अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा
ईडीने आपल्या आरोपपत्रात नोरा फतेहीला सरकारी साक्षीदार म्हणून सादर केले होते. ती या प्रकरणात आरोपी नाही. तथापि, नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिस आणि इतरांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. तिने आरोप केला होता की, जॅकलिनने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तिच्याविरुद्ध खोटी विधाने केली, ज्यामुळे तिच्या करिअरला आणि प्रतिमेला हानी पोहोचली. तपासात जॅकलिनचे नावही समोर आले होते. ठग सुकेशसोबतचे तिचे काही कथित खाजगी फोटोही समोर आले होते, ज्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चाही चर्चेत आल्या होत्या. तथापि, जॅकलिनने हे सर्व दावे फेटाळून लावले.
नोरा फतेहीने नुकतेच एका पॉडकास्टमध्ये या वादावर भाष्य केले. तिने असेही म्हटले आहे की, सुकेशसोबतच्या अफेअरचे दावे पूर्णपणे खोटे असून ती स्वतःच एक पीडित आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या अभिनेत्रीने पॉडकास्टमध्ये सुकेशकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंवरही चर्चा केली. तिने सांगितले की, सुकेश आणि त्याच्या पत्नीने तिला काही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, पण त्यावेळी तिला सुकेशच्या खऱ्या ओळखीबद्दल माहिती नव्हती. या संभाषणादरम्यान ही अभिनेत्री भावूक झालेलीही दिसली.