SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रावणाने जटायूचं एक नख स्वत:कडे का ठेवलं? 'रामायण' चित्रपट पाहून आलेल्या 99% लोकांनाही याची कल्पनाच नाही

सध्या तिकीटबारीवर दमदार कामगिरी करणाऱ्या 'रामायण' चित्रपटामधील एक सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हा सीन पहिल्या भागाच्या क्लायमेक्सचा आहे. याच सीनबद्दल एक रंजक गोष्ट जाणून घेऊयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 19, 2026, 14:53 IST | Updated: Nov 19, 2026, 15:07 IST
Image Credit: रावणाने जटायूचं नखं स्वत:कडे का ठेवलं?
Join

अभिनेता रणबीर कपूर आणि यश यांच्या 'रामायण' चित्रपटाची 1500 कोटी रुपयांच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या चित्रपटामधील अनेक सीन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यापैकीच सर्वाधिक चर्चेत असलेला सीन म्हणजे जटायू आणि रावणामधील संघर्ष! यशने साकारलेला रावण आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी जटायूला दिलेला आवाज याबरोबरच या सीनसाठी वापरण्यात आलेले व्हीएफएक्समुळेही हा सीन चर्चेत आहे. रावणाने सीतेचं हरण करून तिला पुष्पक विमानातून लंकेला घेऊन जाताना जटायूने त्याची वाट अडवली आणि दोघांमध्ये तीव्र संघर्ष झाला.

पूर्ण ताकदीने रावणाविरुद्ध लढला जटायू

गिधाडांचा राजा अशी ओळख असलेल्या जटायूने आपली सर्व शक्ती पणाला लावून सीतेला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र रावणाच्या शक्तीपुढे त्याचं काही चाललं नाही. रावणाने अखेरचा वार केल्यानंतर पुष्पक विमानातून खाली पडणाऱ्या जटायूचं एक नख रावणाने खेचून घेतल्याचं 'रामायण' चित्रपटात पाहायला मिळलं. मात्र रावणाने शत्रू असलेल्या जटायूचं एक नख तोडून स्वत: जवळ का ठेवलं? असा प्रश्न या चित्रपटातील गाजलेल्या दृष्यानिमित्ताने अनेकांना पडला आहे. खरं तर रामायण अगदी पाठ असलेल्या 99 टक्के लोकांना हे दृष्य चित्रपटात का दाखवलं आहे याची कल्पना नाही. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात....

रावण जटायूचे नख स्वतःजवळ का ठेवतो?

रावण आणि जटायू दरम्यान झालेल्या भीषण संघर्षामध्ये जटायू आपल्या नखांनी रावणाचे शीर धडापासून वेगळे करतो. मात्र, रावणाकडे आपले तुटलेले शीर पुन्हा धडाला जोडून घेण्याची मायावी शक्ती असते. आपल्या दैवी शक्तींचा वापर करून, रावण लगेचच एक नवीन शीर आपल्या धडावर लावतो. त्यानंतर तो पूर्वीपेक्षाही अधिक ताकदीने जटायूवर हल्ला करतो. युद्धादरम्यान, रावण आपल्या तलवारीने जटायूचा एक पंखही कापताना दिसतोय. गंभीर जखमी झालेला जटायू बेशुद्ध पडतो. मग रावण तलवारीने जटायूच्या छातीत वार करतो. त्याला पुष्पक विमानातून खाली फेकण्यापूर्वी, रावण त्याचे एक नख तोडून स्वतःजवळ ठेवतो. तोडलेल्या नखाकडे पाहणारा रावणही या सीनमध्ये दाखवण्यात आला आहे.

यामागील कारण काय?

चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या या दृश्यामधून रावणाच्या स्वभावाचे पैलू दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जटायूसारख्या योद्ध्याने आपला मार्ग अडवल्याने रावणाचा आत्मसन्मान दुखावला गेला. रावण अहंकारी होती. त्यामुळे एवढा कठोर संघर्ष करावा लागल्याने त्याच्या अहंकारालाही धक्का लागला. रावणाला स्वत:ची शक्तीचा फार गर्व होता. रावण तिन्ही लोकांमधील जीवांना स्वत:च गुलाम मानायचा. आपल्यापुढे आणि आपल्याकडे असलेल्या दैवी शक्तीपुढे प्रत्येकाने नतमस्तक झालं पाहिले असा रावणाचा अट्टाहास असायचा. असं असताना एका पक्षाने आपल्याला जखमी केलं, पक्षाशी लढताना आपल्याला दैवी शक्ती वापरावी लागली या साऱ्या गोष्टी आपला अपमान करणारा असल्याचं रावणाला वाटलं.

याच रागातून रावणाने जटायूचे नख स्वत:कडे जपून ठेवले. आपल्या आपमानाचं प्रतिक म्हणून रावणाने हे नख जपून ठेवल्याचं सांगितलं जातं. जटायूला हरवल्यानंतरही रावणाला स्वत:चे शौर्य आणि पराक्रम विसरायचा नव्हता.  आपण एखाद्यावर मात केली याचं प्रतिक म्हणून तो जटायूचं नख काढून घेतो. अर्थात हे एक काल्पनिक दृष्य असलं तरी त्यातून रावणाचा अहंकार अधोरेखित करण्याचा हेतू आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES