SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'नवरा माझा नवसाचा' चित्रपटातील कोणता रोल लक्ष्मीकांत बेर्डे यांना देणार होते; सचिन पिळगावकर यांनी सांगितला लाडक्या मित्राचा खास किस्सा

टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या खास कार्यक्रमात सचिन पिळगावकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. लाकडे मित्र आणि दिवंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत खास किस्सा सांगितला.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 17, 2026, 11:54 PM IST | Updated: Oct 18, 2026, 06:21 PM IST
Join

टू द पॉईंट विथ कमलेश सुतार : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांचे लाकडे मित्र आणि दिवंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत खास किस्सा सांगितला आहे. 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटात सचिन पिळगावकर हे लक्ष्मीकांत बेर्डे  यांना खास रोल देणार होते. याबाबत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी चर्चा देखील केली होती. मात्र, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हा रोल का केला नाही. 'नवरा माझा नवसाचा' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यांनी सुरुवातीला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो का लावला? याबाबत झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' या कार्यक्रमात दिलखुलास  गप्पा मारल्या.     

टू द पॉईंट विथ कमलेश सुतार  या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकरांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या काही आठवणी सांगितल्या.  नवरा माझा नवसाचा चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना रोल देण्याचे ठरवले होते. लक्ष्मीकांत बेर्डे आजारी होते तेव्हा मी त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो. तेव्हा मी लक्ष्मीकांत बेर्डे यांना या चित्रपटाबद्दल सांगितले. तेव्हा त्याच्या डोळ्यात चमक आली. मात्र, नंतर त्यांनी मला सांगितले ही आता मला काम करण शक्य होणार नाही. तु माझ्यासाठी थांबू नकोस. चित्रपटाचे काम सुरु ठेव. 

नवरा माझा नवसाचा चित्रपटात प्रदीप पटवर्धन यांना दिलेला रोल लक्ष्मीकांत बेर्डेंना देणार होतो असं सचिन पिळगावकर यांनी सांगितले. अशोक सराफ, सुप्रिया आणि माझ्यानंतर प्रदीप पटवर्धन यांचा या चित्रपटात महत्वाचा रोल होता. प्रदीप पटवर्धन यांनी बाबू कालियाचे पाक्ष साकारले आहे. बाबू कालियाचे पात्र हे चित्रपटात मोटा ट्विस्ट आणणणारे पात्र आहे. 

'नवरा माझा नवसाचा' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी चित्रपटाच्या सुरुवातीलाच लक्षाचा फोटो लावला.  लक्षाचा फोटो पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या तेव्हाच मला कळाले की लक्षाचा आशिर्वाद मला मिळाला आहे. 

 

या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी ट्रोलर्सना देखील उत्तर दिले. मला काम करण्यात अधिक रस. त्यामुळे ट्रोलर्सना उत्तर देण्यात वेळ का वाया घालवू? असा सवाल पिळगावकरांनी उपस्थित केला. तसंच सोशल मीडियावरील कमेंट्स सेक्शन ऑफ न करण्याच्या सूचना टीमला दिल्याचं सचिन पिळगावकांनी आर्वजून म्हटल. माझ्यावर टीका करणारी, माझं कौतुक करणारी ही महाराष्ट्राची पोर आहेत.  ही माझं पोरं आहेत. ते माझ्यावर प्रेम करतात. माझ्यावर वाईट कमेंट करणारे पण माझ्यावर प्रेम करतात असं सचिन पिळगावकर.


 

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES