SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Exclusive : सचिन पिळगावकरांना कोणत्या दिग्दर्शकाची वाटायची भीती? तर गुरूंबद्दलही केला मोठा खुलासा

सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील कोणत्या दिग्दर्शकाला घाबरायचे याबद्दल खुलासा केला आहे. सोबत त्यांनी त्यांच्या गुरूंबद्दलही सांगितलं आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 18, 2026, 07:32 PM IST | Updated: Oct 18, 2026, 07:32 PM IST
Image Credit: sachin pilgaonkar
Join


हिंदी असो मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर हे अनेक कारणांमुळे कायम चर्चेत असतात. बालकलाकार, अभिनेता आणि आता दिग्दर्शन असा सचिन पिळगावकर यांच्या प्रवास आहे. झी 24 तासच्या  टू द पॉईंट विथ कमलेश सूतार' या विशेष कार्यक्रमात सचिन पिळगावकर यांनी दिलखुलास गप्पा मारल्यात. यावेळी त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील कोणत्या दिग्दर्शकाला घाबरायचे आणि त्यांच्या गुरूंबद्दलही पिळगावकर यांनी खुलासा केला आहे.

सचिन पिळगावकरांना कोणत्या दिग्दर्शकाची वाटायची भीती?

या मुलाखतीत त्यांनी बालकलाकार असतानाच्या आठवणी सांगितल्यात. तेव्हाच त्यांनी हादेखील खुलासा केला की, बालकलाकार म्हणून आपण काम करतो तेव्हा आपल्या एक अनपेक्षित फ्रेम मिळतं, एक अचानक महत्त्व प्राप्त होतं. ही मिळालेले महत्त्व त्या वयात आपण सांभाळण्याऐवढी आकलनशक्ती नसते. अशातून तुमच्याकडून चुकीची वागणूक होण्याची शक्यता असते. पण मला आनंद आहे, त्या काळात मी कुठलाही बालकलाकराला असं वागताना पाहिलं नाही. मी सुद्धा यात वातावरणात शिस्त एक कलाकार म्हणून घडलो. त्यावेळचे दिग्दर्शक शिस्त प्रिय होते. ते स्टारडमला पकडून त्यांच्याशी असं झुकून वागणे असे दिग्दर्शक नव्हते. ते कामावर विश्वास ठेवायचे.

त्यांनी पुढे सांगितलं की, लहानपणी काम करताना सगळ्यात दिग्दर्शकाची भीती वाटायची. हेड मास्टरांचं नाव सांगायचं झालं तर टाक्स मास्टर राजाभाऊ परांजपे यांची भीती जास्त वाटायची. ते स्वत: एक अभिनेता असल्याने एका कलाकाराशी कसं वागायचं हे त्यांना माहिती होतं. ते अतिशय शिस्तबद्ध होते.

हेसुद्धा वाचा - Exclusive : 'टीकाकारांनो...'; ट्रोलर्सना सचिन पिळगावकरांचं सडेतोड उत्तर, 'ती महाराष्ट्राची पोरं असतील...'

हिंदी मात्र कोणत्याही दिग्दर्शकाची भीती वाटायची नाही. कारण ते बालकलाकारांशी खूप चांगले वागायचे. मला तरी बालकलाकार म्हणून काम करताना दिग्दर्शकाचा वाईट अनुभव आला नाही. एक कलाकार म्हणून काम करताना दिग्दर्शकाला पाहून दडपण येईल, असं कोणीही हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये वागलेले नाहीय.  

हेसुद्धा वाचा - 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटातील कोणता रोल लक्ष्मीकांत बेर्डे यांना देणार होते; सचिन पिळगावकर यांनी सांगितला लाडक्या मित्राचा खास किस्सा

 

हे आहेत सचिन पिळगावकरांचे गुरू!

याच मुलाखतीत त्यांनी आपल्या गुरूंच्या नावाबद्दलही खुलासा केला आहे. ते म्हणाले की, मी काही टॅलेंडेड फिल्ममेकर अजूनही झालेलो नाहीय. मला जे काही येतं, ते मी करण्याचा प्रयत्न करत सातत्याने कायम करत असतो. मला जे काही शिकता आलंय, वरिष्ठांकडून ते शिकून मी त्याचा वापर करत असतो. कुठे, काय केल्याने काय होतं? हे कायम पाहत आलं आहे. मोठ मोठ्या लोकांची चित्रपट पाहून शिकलो आहे. ऋषिकेश मुखर्जी हे माझ्या गुरूंपैकी एक आहेत. रमेश सिप्पी हे देखील माझ्या गुरूंपैकी एक आहेत. त्यांच्याकडूनही मला बऱ्याच गोष्टी शिकता आलं. बरेच सिनेमे पाहिले. गोल्डी अंकल म्हणजेच विजयानंद यांच्याबरोबर काम केलं. त्यांच्याकडूनही भरपूर काही शिकता आलं.'

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES