टू द पॉईंट विथ कमलेश सुतार : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांचे लाकडे मित्र आणि दिवंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत खास किस्सा सांगितला आहे. 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटात सचिन पिळगावकर हे लक्ष्मीकांत बेर्डे यांना खास रोल देणार होते. याबाबत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी चर्चा देखील केली होती. मात्र, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हा रोल का केला नाही. 'नवरा माझा नवसाचा' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यांनी सुरुवातीला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो का लावला? याबाबत झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' या कार्यक्रमात दिलखुलास गप्पा मारल्या.
टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकरांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या काही आठवणी सांगितल्या. नवरा माझा नवसाचा चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना रोल देण्याचे ठरवले होते. लक्ष्मीकांत बेर्डे आजारी होते तेव्हा मी त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो. तेव्हा मी लक्ष्मीकांत बेर्डे यांना या चित्रपटाबद्दल सांगितले. तेव्हा त्याच्या डोळ्यात चमक आली. मात्र, नंतर त्यांनी मला सांगितले ही आता मला काम करण शक्य होणार नाही. तु माझ्यासाठी थांबू नकोस. चित्रपटाचे काम सुरु ठेव.
नवरा माझा नवसाचा चित्रपटात प्रदीप पटवर्धन यांना दिलेला रोल लक्ष्मीकांत बेर्डेंना देणार होतो असं सचिन पिळगावकर यांनी सांगितले. अशोक सराफ, सुप्रिया आणि माझ्यानंतर प्रदीप पटवर्धन यांचा या चित्रपटात महत्वाचा रोल होता. प्रदीप पटवर्धन यांनी बाबू कालियाचे पाक्ष साकारले आहे. बाबू कालियाचे पात्र हे चित्रपटात मोटा ट्विस्ट आणणणारे पात्र आहे.
'नवरा माझा नवसाचा' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी चित्रपटाच्या सुरुवातीलाच लक्षाचा फोटो लावला. लक्षाचा फोटो पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या तेव्हाच मला कळाले की लक्षाचा आशिर्वाद मला मिळाला आहे.
या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी ट्रोलर्सना देखील उत्तर दिले. मला काम करण्यात अधिक रस. त्यामुळे ट्रोलर्सना उत्तर देण्यात वेळ का वाया घालवू? असा सवाल पिळगावकरांनी उपस्थित केला. तसंच सोशल मीडियावरील कमेंट्स सेक्शन ऑफ न करण्याच्या सूचना टीमला दिल्याचं सचिन पिळगावकांनी आर्वजून म्हटल. माझ्यावर टीका करणारी, माझं कौतुक करणारी ही महाराष्ट्राची पोर आहेत. ही माझं पोरं आहेत. ते माझ्यावर प्रेम करतात. माझ्यावर वाईट कमेंट करणारे पण माझ्यावर प्रेम करतात असं सचिन पिळगावकर.