मराठी कलाविश्व असो किंवा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर हे वयाच्या 68 व्या वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. सचिन पिळगावकर हे सोशल मीडियावरही सक्रीय असता. ते सोशल मीडियावर कायम ट्रोल होत असतात. अशातच टू द पॉईंट विथ कमलेश सूतार' या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची खास मुलाखत झालीय. या मुलाखतीत त्यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय.
टू द पॉईंट विथ कमलेश सूतार या मुलाखतीदरम्यान सचिन यांना ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना सचिन पिळगांवकर म्हणाले की, मला ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी वेळ नाहीय. मला काम करण्यात रस अधिक आहे. त्यामुळे ट्रोलर्सना उत्तर देण्यात वेळ का वाया घालवू? त्या बदल्यात मी असं काही काम केलं ज्याच्यामुळे मला आनंद मिळेल. चला काम राहिलं बाजूला, माझ्या परिवारासोबत राहिलो. सुप्रिया आणि श्रेयाला परदेशात फिरायला घेऊन गेलो, या वेळत मला जास्त समाधान मिळेल. ट्रोलर्सना उत्तर देण्यात वेळ वाया घालवणार नाही
.
सचिन पिळगावकर पुढे म्हणाले की, सोशल मीडियावर असे कमेंट्स येऊ नये म्हणून एक बटण पण असतं, ज्यामुळे तुम्ही कमेंट्स बंद करू शकता. सोशल मीडिया मी सांभाळत नाही, त्यासाठी माझ्याकडे एक टीम आहे. मी या टीमला एकदम सक्त ताकीद दिली आहे, सोशल मीडियावरील कमेंट्स सेक्शन मधील ते बटण ऑन करायचं नाही. ते बटण ऑन केलं तर कमेंट्स बंद होतात. मी सांगून ठेवलं आहे ते बंद करायचं नाही. त्यांना बोलावसं वाटतं प्लीज बोलू द्या. ही आपल्या महाराष्ट्राची पोरं आहेत. जर ती महाराष्ट्राची पोरं असतील म्हणजे ती माझी पोरं आहेत. या महाराष्ट्राने मला भरपूर काही दिलं आहे. त्याची परतफेड मी करु शकत नाही. अशाप्रकारचे ट्रोलिंग झालं तरीसुद्धा प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. मग मी त्यांच्या विचार करायचा की यांचा विचार करायचा.