SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सनी देओल यांच्या घरची सून होणार सचिन तेंडुलकरांची लेक? व्हायरल दाव्याचं सत्य काय?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यामध्ये सारा तेंडुलकर कोणाशी लग्न करणार यासंदर्भात देखील माहिती शेअर करण्यात आली आहे आता नक्की या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे सारा तेंडूलकरने स्वत: या बातमीला दुजोरा दिल्यावरच समजणार आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 21, 2026, 21:08 IST | Updated: Nov 21, 2026, 21:47 IST
Join

Sara Tendulkar- Rajveer Viral Marriage Post : सारा तेंडूलकर मागील काही दिवसांपासून टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल यांच्याशी नाव जोडले जात होते. आता सोशल मिडियावर वृत समोर आले आहे यामध्ये मोठा दावा केला जात आहे की क्रिकेटमधील महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांची लाडकी मुलगी सारा तेंडुलकर लवकरच वधू होणार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्हायरल पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे! या दाव्यामध्ये सारा तेंडुलकर कोणाशी लग्न करणार यासंदर्भात देखील माहिती शेअर करण्यात आली आहे आता नक्की या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे सारा तेंडूलकरने स्वत: या बातमीला दुजोरा दिल्यावरच समजणार आहे.

सचिन तेंडुलकर यांची लाडकी मुलगी सारा तेंडुलकरचे नाव हे ज्येष्ठ अभिनेते सनी देओल यांचा मुलगा राजवीर देओलसोबत जोडले जात आहे. सारा 2027 मध्ये बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सनी देओल यांचा मुलगा राजवीर देओलसोबत लग्नबंधनात अडकू शकते, अशीही चर्चा आहे. शिवाय, दोन्ही कुटुंबांमध्ये नातेसंबंध निर्माण होत असल्याच्या आणि राजवीरने साराला महागड्या भेटवस्तू पाठवल्याच्याही अफवा आहेत. या वृत्तांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नसली तरी, रेडिटवरील या चर्चांनी चाहत्यांची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे.  

हे ही वाचा

रिषभ पंतची विक्रमी खेळी; SENA देशांत 50 षटकार ठोकणारा पहिला आशियाई फलंदाज

जेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट व्हायरल झाली, तेव्हा सारा तेंडुलकर आणि राजवीर देओल यांच्या लग्नाच्या अफवांना जोर चढला. @Bhumika_2026 नावाच्या अकाऊंटवरून केलेल्या या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, राजवीर साराला महागड्या भेटवस्तू पाठवत आहे. त्याच पोस्टमध्ये 2027 मध्ये त्यांच्या लग्नाची शक्यताही वर्तवण्यात आली होती. सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज आपल्या पोस्ट्सने चाहत्यांना आनंदित करते. आता तिच्या नवीन पोस्टने त्यांचा दिवस आनंदमय केला आहे.

सारा तेंडुलकरच्या प्रेमजीवनाबद्दल यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. तिचे नाव भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडले गेले होते. त्यांच्यातील जवळीकीमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अटकळ बांधली गेली, परंतु त्या दोघांपैकी कोणीही आपल्या नात्याला कधीही दुजोरा दिलेला नाही. 2025 मध्ये साराचे नाव अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत जोडले गेले होते. त्यावेळी, ते दोघे एकमेकांना डेट करत असून त्यांनी एकमेकांच्या कुटुंबीयांनाही ओळख करून दिली असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES