SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सैफ अली खानला धमकी, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीनेच...?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येतेय. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 19, 2026, 14:13 IST | Updated: Nov 19, 2026, 15:04 IST
Image Credit: Saif Ali Khan Receives Threat Linked To Baba Siddique murder case mumbai police
Join

टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांना धमक्या मिळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन, तुषार कपूर आणि आयुष्मान कपूर यांनाही काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता अभिनेता सैफ अलीखानला धमकी देण्यात आली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खळबळ उडाली असून कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उभा ठाकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सैफ अली खानला राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तरच्या नावाने धमकी मिळाल्याची माहिती समोर येतेय. मुंबई पोलिसांकडून या धमकीची चौकशी करण्यात येत आहे.

अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुरानालाही यापूर्वी धमक्या मिळाल्या होत्या. या प्रकरणात बंगळुरूतील IIT पदवीधर वैभव मिश्रा (30) याला अटक, AI च्या माध्यमातून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र नंतर वैभव मिश्राचा कोणत्याही टोळीशी संबंध नसल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं.

मुंबई पोलिसांकडून सैफ अली खानला मिळालेल्या धमकीची चौकशी करण्यात येत आहे. धमकी झिशान अख्तरनेच दिली की त्याच्या नावाने अन्य कोणी दिली याची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर झिशान अख्तरला वॉन्टेड घोषित केले आहे. पोलिसांकडून त्याचा शोधही सुरू आहे.

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हे बॉलिवूड कलाकारांच्या खूप जवळचे होते. ते दरवर्षी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासह अनेक चित्रपट आणि टीव्ही कलाकारांना त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित करत असत. 24 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला. ते त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर होते. रात्री सुमारे साडेनऊ वाजता हल्लेखोरांनी गोळीबार केला, त्यात ते जबर जखमी झाले होते. त्यानंतर लिलावती रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी?

अनमोल बिश्नोई, मोहम्मद यासीन अख्तर उर्फ ​​झीशान अख्तर आणि शुभम लोणकर हे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता, यापैकीच एकाचे नाव सैफ अली खान धमकी प्रकरणातही आले आहे. हे सर्व आरोपी फरार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES