बॅालिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान हा त्याच्या अभिनयामुळे सातत्याने चर्चेत पाहायला मिळतो. शाहरुख खान त्याच्या सिनेमांमुळे तर चर्चेत असतोच त्याचबरोबर तो मुंबईतील वांद्रे भागात समुद्र किनाऱ्यावर असलेल्या आलिशान बंगल्यामध्ये 'मन्नत' कोणत्याही पर्यटनस्थळापेक्षा कमी नाही. कारण शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी दररोज त्याच्या बंगल्याखाली दररोज, हजारो चाहते आणि पर्यटक त्याच्या बाहेर उभे राहतात आणि फोटो काढतात. बाहेरून तर प्रत्येकाला मन्नतच्या सौंदर्याची माहिती आहे, पण या चार भिंतींच्या आत किंग खानचे जीवन कसे आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. आता सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये शाहरुखने स्वत: मोठा खुलासा केला आहे.
नुकत्याच झालेल्या दुबईमधील एका लाँच इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता, यावेळी त्याने मोठा खुलासा केला आहे. दुबईमधील एका लाँच इव्हेंटमध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण जोहरने केले होते यावेळी संभाषणाच्यादरम्यान करणने शाहरुखला एक मजेदार प्रश्न केला. करण जोहरने शाहरुखला विचारले की, त्याला स्वत:च्या घरात काय करण्याची परवानगी नाही. यावर शाहरुखने अतिशय मजेशीर शैलीत उत्तर दिले की, त्याला घरातील कोणत्याही प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मन्नत हे पूर्णपणे गौरी खानचे घर आहे आणि ती स्वत:ची मर्जी चालवते, असे त्याने स्पष्टपणे सांगितले. यावर कोणाचेही हसू आवरले नाही सर्वजण कार्यक्रमामध्ये असलेले जोरजोरात हसू लागले.
हे ही वाचा
शाहरुखने घरातील नियमांचे स्पष्टीकरण दिले आणि यावेळी आपल्या घराचे नियम सांगताना शाहरुख खानने सांगितले की, घरात गौरीच्या निवडीबद्दल तो एक शब्दही बोलू शकत नाही. "आम्ही वाय-फायबद्दल काहीही बोलू शकत नाही आणि आम्ही अंथरुणावर बसून खाऊ शकत नाही," तो हसत म्हणाला. याशिवाय भिंतींचा रंग, चित्रे, जिना, लिफ्ट, छत, झुंबर आणि दिवे यांविषयी काहीही बोलण्याची परवानगी नाही. किंग खान गमतीशीर स्वरात म्हणाला की आपण फक्त आरामात बसून घराचा आनंद घेतो आणि म्हणतो गौरीने किती अप्रतिम घर बांधलं आहे. तो असंही म्हणाला की, आता त्याला टेन्शन आहे की, नव्या पेंटहाऊसमध्ये गेल्यावर गौरीने जे डिझाईन केलं आहे त्याचं त्याला कौतुक करावं लागेल.
विनोदाच्या वेळी शाहरुख खान भावूक देखील झाला यावेळी तो म्हणाला की, स्वत: चे घर असणे त्याच्यासाठी इतके का महत्वाचे आहे. गौरी खानशी लग्न करण्यापूर्वी त्याचे आई-वडील खूप लहान वयातच वारले होते. तेव्हापासून स्वतःचे घर बांधणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न बनले होते.