SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हल्ल्यानंतर टायगर श्रॉफचा मोठी डील! मुंबईतील फ्लॅट कोट्यावधी विकला; 18 टक्के प्रॉफीट

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने आपला मुंबईतील फ्लॅट विकला आहे. टायगरने मुंबईतील फ्लॅट कोट्यावधी रुपयांना विकला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 24, 2026, 23:34 IST | Updated: Oct 24, 2026, 23:38 IST
Join

टायगर श्रॉफ :  बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. या प्रकरणी पोलिसानी काही आरोपींना अटक केली असून तपासात नव नवीन अपडेट समोर येत आहे. या सर्व घडामोडी सुरु असताना टायगर श्रॉफने मोठी प्रॉपर्टी डील केली आहे. टायगरने आपला मुंबईतीलआलिशान फ्लॅट  कोट्यावधी रुपयांना विकला आहे. 9 कोटी रुपयांना डील झाली असून टायगरला 18 टक्के प्रॉफीट मिळाले आहे. 

रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्सकडून या डीलबाबत माहिती मिळाली आहे. टायगर श्रॉफने त्याच्या मालकीचा मुंबईतील खार वेस्ट येथे एक आलिशान अपार्टमेंट 9 कोटी रुपयांना विकला आहे. 22 ऑक्टोबर, 2026 या व्यवहाराची नोंदणी झाली होती.

मुंबईतील खार येथील रुस्तमजी पॅरामाउंट डी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नवव्या मजल्यावर टायगर श्रॉफच्या मालकीचा फ्लॅट होता. या फ्लॅटचे एकूण कार्पेट क्षेत्रफळ 1,291.14 चौरस फूट आहे. टायगर श्रॉफने 2018 मध्ये हा फ्लॅट 7.60 कोटींना  खरेदी केली होती. आता, 2026 मध्ये  टायगरने हा फ्लॅट 9 कोटींना विकला. टायगरने या डीलमधून 1.39 कोटींचा मोठा नफा कमावला आहे. फ्लॅटमध्ये 95.80 चौरस फूट स्वतंत्र जागेचाही समावेश आहे. फ्लॅटसोबत खरेदीदाराला बेसमेंट 2 मध्ये दोन झाकलेल्या कार पार्किंगच्या जागाही देण्यात येत आहेत.

गेल्या वर्षी टायगरने आणखी एक अपार्टमेंट 15.6 कोटी रुपयांना विकला होता. 2026 च्या सुरुवातीला, त्याने पुण्यातील हडपसर येथील एक आलिशान मालमत्ता 8.87 कोटी रुपयांना विकली होती.

टायगरच्या कारवर गोळ्या झाडल्या

18 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील जुहू येथील पुष्पा नरसी पार्कबाहरे टायगर श्रॉफवर गोळीबार झाला.  बाईकवरून आलेल्या तीन तरुणांनी त्याच्या कारवर गोळीबार केला. टायगर या गोळीबारात किरकोळ जखमी झाला. या गोळीबारात त्याचा ड्रायव्हर आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाले. 

टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी धक्कादायक माहिती

टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली. ज्या प्रमाणे 26/11तील दहशताद्यांना त्यांचे हँडलर्स फोनवरुन अपडेट्स देत होते त्याच प्रमाणे टायगर श्रॉफ गोळीबारातील आरोपींनाही त्यांचे हँडलर्स गोळीबारानंतर फोन आणि मेसेजद्वारे अपडेट्स देत होते अशी माहिती समोर आली. बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट पाहून आरोपींना पोलिसांच्या तपासाची अपडेट्स वेळोवेळी दिली जात होती अशी माहिती समोर आली. आरोपींचे फोटो टीव्हीवर झळकताच एका शूटरला  “चेहरे आ गए हैं, निकल जाओ”. असा मेसेज हैंडलरने केल्याचं ही समोर आलं. दरम्यान टायर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी पूल सिंग, रेहान अन्सारी आणि रिथिक महतो यांना अटक करण्यात आली  असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक झालीये.. या शूटर्सना अपडेट्स देणारा व्यक्ती लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे का, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES