सातारा न्यूज : एकाचवेळी 9 शिक्षकांची नोकरी गेली आहे. 13 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर ही कारवाई झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागातील 9 शिक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. तर 13 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी ही कारवाई केली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्र न दिल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागामार्फत तीन वेळा नोटीस बजावण्यात आल्या होत्या वारंवार सूचना देऊनही हे शिक्षक प्रशासनाचे ऐकत नसल्याने दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर अनुषंगिक कागदपत्रे मागून सुद्धा संबंधित शिक्षकांनी कागदपत्रे दिली नसल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली. प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील खाजगी अनुदानित शाळांमधील तब्बल 73 शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात आली. मात्र, या कारवाईनंतरही प्रकरण थांबण्याची चिन्हं नाहीत. आणखी 2217 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचा दावा तक्रारदार सादेक इनामदार यांनी केला आहे.
प्राथमिक विभागातील 7 आणि माध्यमिक विभागातील 66 अशा एकूण 73 शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात आली. खाजगी अनुदानित शाळांमधील या शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आलीय. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली.