• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /250 जणांनी सकाळी ईमेल पाहिला, अन् नोकरी गेली…, दिवाळीच्या तोंडावर Amazon मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात

250 जणांनी सकाळी ईमेल पाहिला, अन् नोकरी गेली…, दिवाळीच्या तोंडावर Amazon मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात

दिवाळीच्या तोंडावर Amazon मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात करण्यात आली आहे. सकाळी एक मेल आला 250 जणांच्या नोकऱ्या गेल्यात.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 29, 2026, 02:58 PM IST|Updated: Oct 29, 2026, 03:11 PM IST
joinshare
250 जणांनी सकाळी ईमेल पाहिला, अन् नोकरी गेली…, दिवाळीच्या तोंडावर Amazon मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात
Image Credit: Amazon layoffs

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video

पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video

2

IAS रूबल अग्रवाल यांचा उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचे नगरसेवक पद अखेर रद्द

3

मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पूर्णेकर हत्या प्रकरणी त्यांनी...'

4

हार्दिक पांड्याच्या ट्रेडसंदर्भात आर अश्विनचा मोठा दावा! CSK चे 'हे' तीन खेळाडू द्यावे लागणार?

5

50 लाख प्रवासी, 3 कंपन्या अन् 3 नोव्हेंबर 2026 ची डेडलाईन... नवी मुंबई एअरपोर्टसंदर्भात मोठी अपडेट

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

काही दिवसांवर दिवाळी आली आहे, अशातच नोकऱ्या अचानक गेल्यामुळे 250 जणांना धक्का बसला आहे. अमेरिकेतील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने कर्मचाऱ्यांना आजपासून कामावर येऊ नका असा सकाळी सकाळी मेल पाठवला. अ‍ॅमेझॉन कंपनीमध्ये पुन्हा एकदा नोकरी कपात करण्यात आली आहे. यंदा सर्वाधिक नोकरीकपात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कर्मचाऱ्यांची गेली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 250 कर्मचाऱ्यांना सकाळीच इमेल आणि मोबाईलवर मेसेज पाठवून तुमची नोकरी गेल्याचे सांगण्यात आले.

ॲमेझॉनमध्ये आतापर्यंत किती कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यात?

ऑक्टोबर 2025 - सुमारे 14,000 पदे कॉर्पोरेट 
जानेवारी 2026 - सुमारे 16,000 पदे ग्लोबल कॉर्पोरेट एचआर, आणि टेक
ऑक्टोबर 2026 - 1,000 पदे स्टोअर्स व्यवसाय आणि रिटेल ऑपरेशन्स


कंपनीच्या Devices and Services विभागात Kindle ई-रीडर, Alexa व्हॉइस असिस्टंट असलेली उपकरणे आणि इतर ग्राहक तंत्रज्ञान उत्पादनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली. 

धक्कादायक म्हणजे कंपनीने नुकतीच नवीन किंडल ई-रीडर्स आणि टॅब्लेट्स लॉन्च केलेत. इतकंच नाही, तर बुधवारी अलेक्सा-सक्षम नवीन अलार्म घड्याळ आणि फोटो फ्रेम देखील मार्केटमध्ये मोठ्या धूमधडाक्यात आणले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या महिन्याच्या सुरुवातीला, ॲमेझॉनने आपल्या रिटेल विभागातील जवळपास 1000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले. 

यावर्षाच्या सुरूवातीपासून जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नोकरी कपातीचे वादळ घोंगावत आहे. जर आकडेवारीसंदर्भात बोलायचं झालं तर सुरुवातीच्या काही महिन्यांतच 80,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हा आकडा या वर्षाच्या अखेरपर्यंत 3,00,000 च्या पुढे जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ओरॅकल, नेटफ्लिक्स आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या सातत्याने आपला खर्च कमी करण्यासाठी नोकरीकपाचे हत्यार उपसलंय. पण दुसरीकडे असंख्य कर्मचाऱ्यांचे कुटुंब या नोकरी कपातीमुळे उद्धवस्त झाले आहे. आतातर दिवाळी सणाच्या तोंडावर ही नोकरीकपातीमुळे खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी सतत चिंतेत आहे. मायक्रोसॉफ्ट एआयवर मोठी गुंतवणूक आणि दुसरीकेड खर्च कमी करण्यासाठी ही नोकरी कपात करण्यात येत आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Jobs News
Breaking News