250 जणांनी सकाळी ईमेल पाहिला, अन् नोकरी गेली…, दिवाळीच्या तोंडावर Amazon मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात
दिवाळीच्या तोंडावर Amazon मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात करण्यात आली आहे. सकाळी एक मेल आला 250 जणांच्या नोकऱ्या गेल्यात.
काही दिवसांवर दिवाळी आली आहे, अशातच नोकऱ्या अचानक गेल्यामुळे 250 जणांना धक्का बसला आहे. अमेरिकेतील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने कर्मचाऱ्यांना आजपासून कामावर येऊ नका असा सकाळी सकाळी मेल पाठवला. अॅमेझॉन कंपनीमध्ये पुन्हा एकदा नोकरी कपात करण्यात आली आहे. यंदा सर्वाधिक नोकरीकपात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कर्मचाऱ्यांची गेली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 250 कर्मचाऱ्यांना सकाळीच इमेल आणि मोबाईलवर मेसेज पाठवून तुमची नोकरी गेल्याचे सांगण्यात आले.
ॲमेझॉनमध्ये आतापर्यंत किती कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यात?
ऑक्टोबर 2025 - सुमारे 14,000 पदे कॉर्पोरेट
जानेवारी 2026 - सुमारे 16,000 पदे ग्लोबल कॉर्पोरेट एचआर, आणि टेक
ऑक्टोबर 2026 - 1,000 पदे स्टोअर्स व्यवसाय आणि रिटेल ऑपरेशन्स
कंपनीच्या Devices and Services विभागात Kindle ई-रीडर, Alexa व्हॉइस असिस्टंट असलेली उपकरणे आणि इतर ग्राहक तंत्रज्ञान उत्पादनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली.
धक्कादायक म्हणजे कंपनीने नुकतीच नवीन किंडल ई-रीडर्स आणि टॅब्लेट्स लॉन्च केलेत. इतकंच नाही, तर बुधवारी अलेक्सा-सक्षम नवीन अलार्म घड्याळ आणि फोटो फ्रेम देखील मार्केटमध्ये मोठ्या धूमधडाक्यात आणले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या महिन्याच्या सुरुवातीला, ॲमेझॉनने आपल्या रिटेल विभागातील जवळपास 1000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले.
यावर्षाच्या सुरूवातीपासून जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नोकरी कपातीचे वादळ घोंगावत आहे. जर आकडेवारीसंदर्भात बोलायचं झालं तर सुरुवातीच्या काही महिन्यांतच 80,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हा आकडा या वर्षाच्या अखेरपर्यंत 3,00,000 च्या पुढे जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ओरॅकल, नेटफ्लिक्स आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या सातत्याने आपला खर्च कमी करण्यासाठी नोकरीकपाचे हत्यार उपसलंय. पण दुसरीकडे असंख्य कर्मचाऱ्यांचे कुटुंब या नोकरी कपातीमुळे उद्धवस्त झाले आहे. आतातर दिवाळी सणाच्या तोंडावर ही नोकरीकपातीमुळे खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी सतत चिंतेत आहे. मायक्रोसॉफ्ट एआयवर मोठी गुंतवणूक आणि दुसरीकेड खर्च कमी करण्यासाठी ही नोकरी कपात करण्यात येत आहे.