SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

3 AM ला देशातील सर्वात मोठ्या बँकेने थांबवले सर्व व्यवहार! 30 लाख ग्राहकांचे पैसे अडकले; बँक शाखांना पोलीस छावण्यांचं स्वरुप, रात्रभर रस्त्यांवर गोंधळ

आयुष्यभराची कमाई सुरक्षित ठेवावी म्हणून बँकेत पैसे ठेवलेल्या 30 लाख ग्राहकांचे पैसे अडकून पडले असून त्यांना आता काय करावे हे कळत नाहीये. पहाटे तीनच्या सुमारास या बँकेचं कामकाज बंद करण्यात आलं.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 06, 2026, 10:39 AM IST | Updated: Nov 06, 2026, 11:00 AM IST
Image Credit: आर्थिक संकटामुळे राजकीय संकटाचे ढग (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - 'रॉयटर्स'वरुन साभार)
Join

तुम्ही तुमच्या आयुष्यभराची कमाई बँकेत पैसे सुरक्षित राहतात म्हणून बँकेत जमा केली आणि एके दिवशी अचानक बँकेला टाळं लागलं तर? अशावेळी काय करावं? कुणाकडे जावं? या विचारानेच धडकी भरते की नाही? मात्र हा प्रकार एका देशात घडला असून ज्या बँकेने हा प्रकार केला आहे ती या देशातील सर्वात मोठी बँक आहे. विशेष म्हणजे या बँकेत या देशातील लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक लोकांचे पैसे असून आता हा सर्व पैसा अडकून पडला आहे. या साऱ्या गोंधळाचा फटका 30 लाख खातेधारकांना बसल्याचं वृत्त आहे. नेमकं झालं काय? ही बँक कोणती? नक्की प्रकरण काय आहे जाणून घेऊयात...

कुठे आणि कोणत्या बँकेसंदर्भात घडला हा प्रकार?

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणार हा प्रकार घडला आहे दक्षिण अमेरिका खंडातील पॅराग्वे देशात! येथील सर्वात मोठी बँक असलेल्या युनो बँकला अचानक टाळं लागलं आहे. ही बातमी वाऱ्याचे वेगाने पसरली आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. देशातील आर्थिक क्षेत्रातील या गोंधळामुळे राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. युनो बँकने 3 नोव्हेंबर रोजी रात्री तीनच्या सुमारास सर्व व्यवहार बंद केले आणि आपल्या सर्व शाखांना टाळं लागल्याचं जाहीर केलं. यामुळे  30 लाख ग्राहकांना फटका बसला आहे.

रात्री तीन वाजता बँकेचे व्यवहार बंद अन् 30 लाख ग्राहक अडकले

पॅराग्वेची मध्यवर्ती बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ पॅराग्वेने आर्थिक दिवाळखोरीच्या भीतीने 3 नोव्हेंबरला पहाटे तीन वाजता युनो बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे बँकेच्या 30 लाख ग्राहकांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. या ग्राहकांना त्यांच्या खात्यांमधून पैसे काढता येत नसून बँकेच्या ॲपवर खात्यातील बॅलेन्स दिसत नसल्याने बँकेचे सर्वच ग्राहक प्रचंड घाबरले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता अशाप्रकारे बँक बंद केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. अचानक आलेल्या या आर्थिक संकटामुळे पॅराग्वेमधील लाखो सामान्य नागरिकांची आयुष्यभराची कमाई बँकेत अडकून पडली आहे. हे पैस कधी परत मिळतील याबद्दलची कोणतीही माहिती या ग्राहकांकडे नाही. देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक ग्राहक संख्या असलेली युनो बँक अचानक बंद पडल्याचे समजताच संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहे. सध्या पॅराग्वेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून लोक त्यांचे पैसे परत करण्याची मागणी करत आहेत. यासाठी मागील काही दिवसांपासून इथे रात्रभर रस्त्यांवर गोंधळ सुरु असल्याचं दिसत आहे. दिवसाही इथं आंदोलनं होत आहेत.

बँक का बंद करावी लागली? मध्यवर्ती बँकेने काय सांगितलं?

युनो बँकेला मोठ्या आर्थिक दिवाळखोरीचा सामना करावा लागत होता, असं या निर्णयासंदर्भात माहिती देताना सेंट्रल बँक ऑफ पॅराग्वेने सांगितल्याचं वृत्त 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. बँकेची आर्थिक स्थिती प्रचंड खालावल्याने आणि घोटाळ्यांसंदर्भातील काही संशयामुळे मध्यवर्ती बँकेला युनो बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या गोंधळात सर्वसामान्य जनता भरडली जात असून त्यांनी तातडीने त्याचे पैसे परत करावेत अशी मागणी केली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES