जगभर खळबळ! 30 वर्षांपासून मृत्यूदंडाच्या प्रतिक्षेत असलेली महिला आरोपी विषाचा डबल डोस दिल्यानंतरही वाचली; आता...
या महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून वर्गमैत्रिणीची निर्घृणपणे हत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेहाच्या शरीरावर ब्लेडने काही आकृत्या काढल्या होत्या. या प्रकरणामध्ये 30 वर्षांपूर्वीच दोषी ठरवलं आहे.
अमेरिकेमध्ये एक विचित्र प्रकार सध्या चर्चेत आहे. येथे एका महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र तिला मृ्त्युदंड देण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. त्यामुळे ही महिला सध्या जगभरात सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डबल विषाचा डोस देऊनही या महिलेवर काहीही परिणाम झाला नाही आणि ती आजही जिवंत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचं नाव क्रिस्टा पाइक असं आहे. तिला विषाचं इंजेक्शन देऊन मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली. एका तरुणीची क्रूरपणे हत्या केल्याप्रकरणी ती दोषी ठरल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आलेली. पण तिला इंजेक्शनमधून विषाचा डबल डोस दिल्यानंतरही तिचा मृत्यू झाला नाही. तिला फक्त अस्वस्थ वाटत असल्याने आणि नियमानुसार तडफडून कैदी मरता कामा नये अशी तरतूद असल्याने तिच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
विषाचे दोन डोस दिले पण...
क्रिस्टा पाइकलाी मृत्युदंडासाठी पेंटोबार्बिटलच्या दोन मात्रा देण्यात आल्या. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. हे औषध देण्यासाठी पथकाने सुमारे तासभर प्रयत्न केले. त्यांच्या डाव्या हातावर किमान सात सुया टोचण्यात आल्या. तरीही हे प्रयत्न अपयशी ठरले आणि यामधून क्रिस्टा वाचली.
इतर कैद्यांना दिलासा
मात्र क्रिस्टा पाइक चमत्कारिकरित्या वाचल्याने टेनेसी राज्याचे राज्यपाल बिल ली यांनी या वर्षातील नियोजित मृत्युदंडांना अनिश्चित काळासाठी स्थगिती देत स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच क्रिस्टासोबतच इतर कैद्याची मृत्यूदंडाची शिक्षाही पुढे ढकलली गेली आहे.
नेमके प्रकरण काय ?
क्रिस्टा पाइकला 1995 मध्ये 19 वर्षीय वर्गमैत्रीण कोलीन स्लेमरच्या हत्येप्रकरणी मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. त्या वेळी ती 18 वर्षांची होते. जानेवारी 1995 मध्ये, क्रिस्टाने तिचा 17 वर्षीय प्रियकर टॅडारिल शिप आणि एका मैत्रिणीसोबत मिळून तिच्याच वर्गातील कॉलीनची जंगलात नेऊन अत्यंत निर्घृण हत्या केली होती. हत्या करताना आरोपींनी कॉलीनच्या छातीवर ब्लेडने सैतानी पूजेचे प्रतीक मानले जाणारे पेंटाग्राम (पंचकोनी तारा) चिन्ह कोरले होते. खळबळजनक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर क्रिस्टाने मृत कॉलीनच्या कवटीचा एक तुकडा आठवण म्हणून आपल्या बॅगेत ठेवला होता आणि ती इतर विद्यार्थ्यांना तो अभिमानाने दाखवायची.
शिक्षा बदलण्याची मागणी
क्रिस्टा पाइकच्या वकिलांनी आता मृत्युदंडाच्या शिक्षेची अन्य शिक्षेत रूपांतर करण्याची मागणी केली आहे. टेनेसीमध्ये याच वर्षी मृत्युदंडाची प्रक्रिया अपयशी ठरण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे मृत्युदंडाच्या प्रक्रियेतील सुरक्षितता आणि पेंटोबार्बिटलच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. कॉलीनची हत्या करण्यात आली तेव्हा क्रिस्टा प्रियकर टॅडारिल हा 17 वर्षांचा म्हणजेच नाबालिक असल्याने त्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती.