SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Explained: 'घोस्ट पार्टिकल' शोधणाऱ्याला नोबेल; दक्षिण ध्रुवावर मागील 30 वर्षांपासून नेमकं काय सुरु आहे?

जगातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या नोबेलकडून भौतिकशास्त्रातील म्हणजेच फिजिक्समधील पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार नेमका कोणाला आणि कशासाठी देण्यात आला आहे? या व्यक्तीने काय संशोधन केलं आहे? त्याचा काय फायदा होणार आहे जाणून घेऊयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 07, 2026, 08:31 AM IST | Updated: Oct 07, 2026, 08:43 AM IST
Image Credit: मागील 30 वर्षांपासून ही व्यक्ती नेमकं काय करतेय? (फोटो icecube वरुन साभार)
Join

भौतिकशास्त्रातील म्हणजेच फिजिक्समधील नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हॅल्ड्रोन यांना मंगळवारी जाहीर झाला. 'आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी' मधील योगदान आणि खगोलभौतिकीय उत्पत्तीच्या उच्च ऊर्जा न्युट्रिनोच्या शोधासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. फ्रान्सिस हॅल्ड्रोन यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे 'न्यूट्रिनो अ‍ॅस्ट्रॉनॉमी' क्षेत्राला नवीन गती मिळेल आणि या क्षेत्राकडे अधिक संशोधक आणि विद्यार्थी आकर्षित होतील असं मानलं जात आहे. हे क्षेत्र नेमकं आहे काय? फ्रान्सिस हॅल्ड्रोन यांनी नक्की कसलं संशोेधन केलंय? जाणून घेऊयात सविस्तरपणे...

नोबेल पुरस्कार समितीने काय म्हटलं?

भौतिकशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष मार्क पीअर्स यांनी फ्रान्सिस हॅल्ड्रोन यांच्या कार्याचा उल्लेख या पुरस्काराची घोषणा करताना केला. "फ्रान्सिस हॅल्झेन यांनी आपल्याला एक खूप चांगले उपकरण दिले असून, संशोधक आणि अभियंत्यांच्या आंतरराष्ट्रीय टीमचे नेतृत्वही केले आहे. त्यांच्या चिकाटीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने खगोलशास्त्राचा नवा प्रकार समोर आला आहे," असे मत मार्क पीअर्स यांनी व्यक्त केले. 

हॅल्झेन यांनी पुरस्कारासंदर्भात काय म्हटलं?

हॅल्झेन यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नोबेल पुरस्कार वितरण समितीबरोबर फोनवरून संवाद साधला. "नोबेल पुरस्कारासाठी माझ्या नावाची घोषणा अनपेक्षित होती. मला अजिबातच त्याची अपेक्षा नव्हती," असे हॅल्झेन म्हणाले. हॅल्झेन हे मूळचे बेल्जियमचे असून, सध्या अमेरिकेतील विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठाशी संलग्न आहेत.

न्यूट्रिनो काय असतं?

न्यूट्रिनो हे सूक्ष्म कण असतात. त्यांचे वस्तुमानही अतिशय कमी असते. हे कण सगळीकडे असतात. हे विश्वातील अत्यंत सूक्ष्म, विद्युत प्रभार नसलेले आणि नगण्य वस्तुमान असलेले उप-अणू कण आहेत. सूर्यासारख्या ताऱ्यामधून ते मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात आणि आपल्या शरीरातून सेकंदाला अब्जावधी असे कण आरपार होतात. हे कण दिसत नाहीत. हे कण जेव्हा कशावर तरी आदळतात, त्या वेळी जो प्रकाश अथवा भारित कण तयार होतात, त्यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञ वेगवेगळे अनुमान काढतात. न्यूट्रिनो हे खरं तर असून नल्यासारखे भासत असल्याने त्यांना 'घोस्ट पार्टिकल्स' असेही म्हणतात.

हॅल्झेन यांनी नेमकं काय केले?

शास्त्रज्ञ ज्या कणांना विश्वाचे 'संदेशवाहक' मानतात; अशा न्यूट्रिनोच्या एका दुर्मीळ गटाचा हॅल्ड्रोन यांनी अभ्यास केला. विश्वाची उत्पत्ती कशी झाली, याचे संकेत हे कण देतात. दक्षिण ध्रुवावरील न्यूट्रिनोबाबतचे त्यांचे संशोधन 1980 च्या दशकापासून सुरू आहे.

'आइसक्यूब न्युट्रिनो ऑब्झर्वेटरी' काय आहे?

फ्रान्सिस हॅल्झेन यांनी 1988 मध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण कल्पना मांडली. त्यांनी अंटार्क्टिकाच्या दक्षिण ध्रुवावरील हजारो मीटर खोल नैसर्गिक बर्फाचा वापर एक महाकाय  पार्टिकल डिटेक्टर म्हणून करण्याची पद्धत शोधली.  त्यांच्या या वैज्ञानिक दृष्टिकोनातून दक्षिण ध्रुवावर 1 घन किलोमीटर (1 क्युबिक किलोमीटर) आकाराची जगातील सर्वात मोठी 'आइसक्यूब न्युट्रिनो ऑब्झर्वेटरी' उभारण्यात आली. 'आइसक्यूब न्युट्रिनो ऑब्झर्वेटरी' ही एक अंटार्क्टिकामधील संशोधन संस्था आहे. या संस्थेमधील विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठ ही प्रमुख संस्था आहे. या ऑब्झर्वेटरीअंतर्गत बर्फाच्या आत सुमारे 1450 ते 2450 मीटर खोलीवर हजारो हाय-टेक लाइट सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.

हॅल्झेन आणि त्यांच्या टीमने शोधून काढले की, जेव्हा अति-ऊर्जावान न्यूट्रिनो बर्फातील अणूंच्या केंद्रावर आदळतात, तेव्हा निळ्या रंगाचा एक विशिष्ट प्रकाश निर्माण होतो. 'आइसक्यूब न्युट्रिनो ऑब्झर्वेटरी'मधील सेन्सर्सनी हा प्रकाश टिपून न्यूट्रिनोचे अस्तित्व सिद्ध केले.

न्यूट्रिनोचा ब्रह्मांडाच्या रहस्यांशी काय संबंध?

न्यूट्रिनो हे अंतराळातील सर्वात हिंसक आणि विनाशकारी घटनांमधून, जसे की सुपरनोव्हा ब्लास्ट, ब्लॅक होल्स किंवा गॅलेक्सींचे विलीनीकरणातून तयार होतात. हॅल्झेन यांच्या शोधामुळे या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंच्या मूळ स्रोतांचा मार्ग शोधणे शक्य झाले आहे. यातूनच खगोलशास्त्रामध्ये 'न्यूट्रिनो अ‍ॅस्ट्रॉनॉमी' या एका संपूर्ण नवीन अभ्यासशाखेचा पाया रचला गेला आहे. यामुळे खगोलभौतिकशास्त्रात एक नवे दालन उघडले गेले आहे.


गेल्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल 'क्वांटम टनेलिंग' वरील संशोधनासाठी  जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस या तीन शास्त्रज्ञांना जाहीर झाले होते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES