SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मेटाला ₹200000000000 चा दंड, फेसबुकच्या चुकीचा कंपनीला दणका; तुमच्या पर्सनल डेटाचं काय?

कॅम्ब्रिज अ‍ॅनालिटीका डेटा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने मेटाला 25 अब्ज डॉलरचा दंड ठोठावला. फेसबुकने यूजर्सची दिशाभूल केल्याचा ज्युरींचा निष्कर्ष असून मेटा अपील करणार आहे.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 05, 2026, 02:39 PM IST | Updated: Nov 05, 2026, 02:52 PM IST
Image Credit: मेटाला दंड
Join

सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी मेटाला अमेरिकेत मोठा कायदेशीर धक्का बसलाय. फेसबुक युजर्सची वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेबाबत दिशाभूल केल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने कंपनीला तब्बल 25 अब्ज डॉलरचा दंड भरण्याचे आदेश दिलेयत. भारतीय रुपयांत ही रक्कम सुमारे दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

काय नेमकं प्रकरण?

न्यू मेक्सिकोमधील न्यायाधीश फ्रान्सिस मॅथ्यू यांनी 21 ऑक्टोबर 2026 रोजी मेटाला 25 अब्ज डॉलरचा दंड भरण्याचा आदेश दिला. राज्याच्या कायद्यानुसार 219 अब्ज डॉलरपेक्षा अधिक दंड योग्य ठरू शकतो, असे न्यायालयाने नमूद केले होते. यानंतर अंतिम दंडाची रक्कम कमी करून 25 अब्ज डॉलर निश्चित करण्यात आली. अमेरिकेच्या इतिहासातील एखाद्या कंपनीवरील हा सर्वात मोठ्या आर्थिक दंडांपैकी एक मानला जात आहे.

कॅम्ब्रिज डेटा घोटाळ्याशी काय संबंध?

2018 मध्ये कँम्ब्रिज अ‍ॅनॅलेटीका या ब्रिटिश राजकीय सल्लागार कंपनीने फेसबुकवरील तृतीय-पक्ष अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यवधी यूजर्सची पर्सनला माहिती मिळवल्याचे उघड झाले होते. अंदाजे 87 दशलक्ष यूजर्सचा डेटा त्यांच्या स्पष्ट संमतीशिवाय मिळवण्यात आल्याचा आरोप होता. या माहितीचा वापर मतदारांचे प्रोफाइल तयार करण्यासाठी आणि राजकीय जाहिराती लक्ष्यित करण्यासाठी करण्यात आला. 2016 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार चर्चेत आला होता.

फेसबुककडून यूजर्सची दिशाभूल

न्यू मेक्सिको राज्याच्या अ‍ॅटर्नी जनरल यांनी 2021 मध्ये मेटाविरोधात खटला दाखल केला होता. यूजर्सचा डेटा कोणाला उपलब्ध होतो, त्याचा वापर कसा केला जातो आणि प्लॅटफॉर्मवरील द्वेषपूर्ण मजकूर व चुकीच्या माहितीवर कंपनी कशी कारवाई करते, याबाबत फेसबुकने दिशाभूल करणारी विधाने केल्याचा आरोप होता. सप्टेंबर 2026 मध्ये ज्युरींनी मेटा आणि कंपनीच्या नेतृत्वाने केलेल्या 29 पैकी 26 विधानांना दिशाभूल करणारे ठरवले. 

मेटाचा निर्णयाला विरोध

न्यायालयाच्या निर्णयानंतर मेटाचे मुख्य कायदेशीर अधिकारी सी. जे. महोनी यांनी कंपनी या निकालाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. कंपनीला अपीलमध्ये विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या खटल्यातून ऑनलाइन अभिव्यक्तीवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा मेटाने केलाय.

मेटावर यााधीही झालीय मोठी कारवाई 

कॅम्ब्रिज अ‍ॅनॅलेटीका प्रकरणात मेटाला 2019 मध्ये अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनकडून पाच अब्ज डॉलरचा दंड झाला होता. आता न्यू मेक्सिकोतील निर्णयामुळे डेटा गोपनीयतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. सोशल मीडिया कंपन्या यूजर्सची माहिती कशी गोळा करतात? ती कोणासोबत शेअर करतात आणि जाहिरातींसाठी तिचा वापर कसा करतात, याबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. भारतातही फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे मोठ्या प्रमाणावर यूजर्स आहेत. त्यामुळे वैयक्तिक माहिती शेअर करताना अ‍ॅपच्या परवानग्या, प्रायव्हसी सेटिंग्ज आणि थर्ड-पार्टी अॅप्सना दिलेला प्रवेश तपासणे महत्त्वाचे ठरते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES