SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जगावर येणार मोठं संकट? एल निनोबाबत शास्त्रज्ञांनी केलेले भाकित धडकी भरवणारं, महाविनाशकारी टायफून...

पॅसिफिक महासागराचे तापमान विक्रमी पातळीपर्यंत वाढले आहे. तीव्र एल निनोमुळे आता पूर्व आशियाला मोठ्या चक्रीवादळांचा धोका निर्माण झाला आहे. जपान, चीन, तैवान आणि फिलीपिन्सला मोठ्या प्रमाणावर विध्वंस आणि पुराचा सामना करावा लागू शकतो

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 06, 2026, 11:23 AM IST | Updated: Nov 06, 2026, 11:24 AM IST
Image Credit: pacific ocean warming
Join

प्रशांत महासागराचे तापमान सातत्याने वाढत आहे.  एखादा रुग्ण तापाने फणफणावा अशा प्रकारे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढत आहे. पू्र्व आणि दक्षिण-पूर्व आशियातील किनारपट्टी परिसर म्हणजेच फिलिपिन्स, तैवान, चीन आणि जपानमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी लोकांना समुद्री वादळे आणि खराब हवामानाचा अनुभव हा असतोच. अल निनोचा परिणाम यामुळं महासागर गरजेपेक्षा जास्त उष्ण झाल्याने आता पूर्व आशियावर आत्तापर्यंतचा सर्वात धोकादायक टायफून (चक्रीवादळ) घोंगावतेय.

अल निनो ही अशी नैसर्गिक घटना आहे जिथे प्रशांत महासागराचे पाणी अचानक गरम होते. याचा थेट परिणाम जगभरातील हवामानावर होतो. मात्र यंदाचे अल निनो सामान्य नसून युके सेट ऑफिसच्या नुसार, हे आत्तापर्यंतच्या इतिहासातील भयानक एल नीनो असू शकते. ही परिस्थिती मार्चपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

फिलिपिन्सच्या राष्ट्रीय हवामान विभागाने प्रमुख वैज्ञानिक एना लिजा सोलिस यांनी मनिला येथे एक प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रशांत महासागरच्या स्थितीची तुलना तापाने फणफणलेल्या व्यक्तीशी केली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, या स्थितीमुळं महाविनाशकारी वादळांचा जन्म होऊ शकतो. जपानच्या हवामान एजन्सीच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये भूमध्यरेखीय प्रशांत महासागराचे तापमान सामान्यापेक्षा पू्र्ण 4 अंश अधिक आहे. 1949 पासून या महासागरातील रेकॉर्ड ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या आधी डिसेंबरमध्ये हा रेकॉर्ड 3.6 डिग्री सेल्सियस इतका होता. जेव्हा समुद्राचे पाणी अधिक गरम होते तेव्हा चक्रीवादळे निर्माण होतात.

या वर्षी दक्षिण-पूर्व आणि पूर्व-आशियातील चक्रीवादळाची तीव्रता मागील वर्षांच्या तुलनेने दुप्पट झाली आहे. या परिस्थितीमुळं फक्त चक्रीवादळाची तीव्रताच नाही तर दिशादेखील बदलते. एल निनोच्या कारणावरुन हवेचा प्रवाह बदलतो. ज्यामुळं पूर्वेकडे चक्रीवादळाची तीव्रता अधिक वाढते.

फिलिपिन्सची राजधानी मनिला येथील हवामान शास्त्रज्ञ राफेला जेन डेल्फिनो आणि त्यांच्या संशोधन पथकाने, तापमान वाढत राहिल्यास वादळे कशी दिसू शकतात हे समजून घेतले. त्यांनी 2013च्या विनाशकारी 'हाययान' या महाचक्रीवादळाच्या माहितीचे विश्लेषण केले, ज्यामध्ये 6,000 हून अधिक लोकांचा बळी गेला होता.

समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे या वादळांमधून होणाऱ्या एकूण पावसात 26 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. फिलीपिन्ससारख्या देशासाठी हा एक मोठा धोका आहे, जिथे दरवर्षी सरासरी 20 चक्रीवादळे येतात. फिलीपिन्समध्ये वारंवार येणाऱ्या पुरांमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला आहे. सरकारी भ्रष्टाचार आणि पूर नियंत्रण पायाभूत सुविधांसाठी वाटप केलेल्या निधीच्या गैरव्यवस्थापनाविरोधात देशभरात व्यापक निदर्शने होत आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES