• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /दोन हेलिकॉप्टरची हवेतच एकमेकाला धडक; कॅमेऱ्यात LIVE कैद झाली दुर्घटना, कोसळून खाली प्रवाशांवर पडणार इतक्यात...

दोन हेलिकॉप्टरची हवेतच एकमेकाला धडक; कॅमेऱ्यात LIVE कैद झाली दुर्घटना, कोसळून खाली प्रवाशांवर पडणार इतक्यात...

नेपाळमध्ये हेलिपॅडवर उतरताना दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाला, असून एक जखमी झाला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 03, 2026, 10:26 AM IST|Updated: Nov 03, 2026, 10:33 AM IST
joinshare
दोन हेलिकॉप्टरची हवेतच एकमेकाला धडक; कॅमेऱ्यात LIVE कैद झाली दुर्घटना, कोसळून खाली प्रवाशांवर पडणार इतक्यात...
Image Credit: दोन हेलिकॉप्टरची हवेतच एकमेकाला धडक

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
सांगली - पडळकरांच्या जत सोसायटी गटाच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत चिठ्ठी सापडल्याने खळबळ; आत लिहिलं होतं 'लिंगायत...'

सांगली - पडळकरांच्या जत सोसायटी गटाच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत चिठ्ठी सापडल्याने खळबळ; आत लिहिलं होतं 'लिंगायत...'

2

टायगर श्रॉफनंतर बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्याला धमकी, '5 कोटी दे नाहीतर...'

3

निलेश लंकेंनी भाकरीच फिरवली! मातब्बर नेत्यांना शह, अहिल्यानगर जिल्हा बँकेत दणदणीत विजय; विखेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

4

'मुलीला वेडी बोलायचा, तक्रार करणार ऐकल्यानंतर घाबरला अन् त्यानंतर...', विद्यार्थ्याने चिमुरडीवरील केलेल्या हल्ल्याचं खरं कारण उघड

5

समृद्धी महामार्गावर पुन्हा दरोडा, सरकारी अभियंत्यालाच लुटले, पिस्तुलाचा धाक दाखवला अन् इनोव्हा कार पळवली...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून भीषण दुर्घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोलुखुम्बु जिल्ह्यात (Nepal's Solukhumbu district)  राजधानी काठमांडूपासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या हेलिपॅडवर ही दुर्घटना घडली. येथे मंगळवारी सकाळी दोन हेलिकॉप्टर्स एकमेकांवर आदळली. या दुर्घटनेत एक परदेशी नागरिक ठार झाला, तर अन्य एक व्यक्ती जखमी झाली आहेे.

फेरिचे (Pheriche) हेलिपॅडवर घडलेल्या या अपघातात 'फिशटेल एअर' (Fishtail Air) आणि 'डायनेस्टी एअर' (Dynasty Air) या कंपन्यांची हेलिकॉप्टर्स एकमेकांवर आदळली. नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (Civil Aviation Authority of Nepal) दिलेल्या माहितीनुसार, हेलिपॅडवर लँडिंग करत असताना दोन्ही हेलिकॉप्टर्सचे रोटर ब्लेड्स (पाती) एकमेकांना धडकले.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांच्या अत्यंत जवळ आल्याचे आणि त्यांचे रोटर ब्लेड्स एकमेकांना धडकल्याचे कैद झाले आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी एक व्यक्ती परदेशी नागरिक आहे, परंतु त्यांची ओळख आणि राष्ट्रीयत्व अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह नंतर हेलिकॉप्टरद्वारे लुकला येथे नेण्यात आला. या अपघातात जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीला उपचारांसाठी दुसऱ्या हेलिकॉप्टरद्वारे हलवण्यात आले.

नागरी उड्डाण प्राधिकरणाचे माहिती अधिकारी ज्ञानेंद्र भुल यांनी या अपघाताला दुजोरा दिला असून, अधिकारी या घटनेबाबत अधिक माहिती गोळा करत असल्याचे सांगितले. अपघात नेमक्या कोणत्या परिस्थितीत घडला, याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.

नेपाळमध्ये पर्यटकांना आणि गिर्यारोहकांना ने-आण करण्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी तसेच आपत्कालीन बचाव कार्यासाठी लहान हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nepal News