• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /समृद्धी महामार्गावर पुन्हा दरोडा, सरकारी अभियंत्यालाच लुटले, पिस्तुलाचा धाक दाखवला अन् इनोव्हा कार पळवली...

समृद्धी महामार्गावर पुन्हा दरोडा, सरकारी अभियंत्यालाच लुटले, पिस्तुलाचा धाक दाखवला अन् इनोव्हा कार पळवली...

समृद्धी महामार्गावर भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून अभियंत्याला लुटल्याची घटना समोर आली आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 03, 2026, 10:42 AM IST|Updated: Nov 03, 2026, 10:45 AM IST
joinshare
समृद्धी महामार्गावर पुन्हा दरोडा, सरकारी अभियंत्यालाच लुटले, पिस्तुलाचा धाक दाखवला अन् इनोव्हा कार पळवली...
Image Credit: प्रातिनिधीक फोटो

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
सांगली - पडळकरांच्या जत सोसायटी गटाच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत चिठ्ठी सापडल्याने खळबळ; आत लिहिलं होतं 'लिंगायत...'

सांगली - पडळकरांच्या जत सोसायटी गटाच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत चिठ्ठी सापडल्याने खळबळ; आत लिहिलं होतं 'लिंगायत...'

2

टायगर श्रॉफनंतर बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्याला धमकी, '5 कोटी दे नाहीतर...'

3

निलेश लंकेंनी भाकरीच फिरवली! मातब्बर नेत्यांना शह, अहिल्यानगर जिल्हा बँकेत दणदणीत विजय; विखेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

4

'मुलीला वेडी बोलायचा, तक्रार करणार ऐकल्यानंतर घाबरला अन् त्यानंतर...', विद्यार्थ्याने चिमुरडीवरील केलेल्या हल्ल्याचं खरं कारण उघड

5

समृद्धी महामार्गावर पुन्हा दरोडा, सरकारी अभियंत्यालाच लुटले, पिस्तुलाचा धाक दाखवला अन् इनोव्हा कार पळवली...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा दरोडा पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून सरकारी अभियंत्याला लुटल्याची घटना समोर आली आहे. आमने टोलनाक्याजवळ हा थरार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

आमने टोलनाक्याजवळ कार आडवी लावून 4 ते 5 मास्कधारी हल्लेखोरांनी सरकारी अभियंता आणि त्यांच्या चालकाला पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर 30 हजार रुपयांची रोकड, मोबाइल आणि इनोव्हा कार घेऊन आरोपींनी पळ काढला. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

फरीद खान हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असून, मुंबईतील कळवा येथील मुद्रा व जलसंधारण विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी ते चालक कृष्णा बाविस्कर यांच्यासह छत्रपती संभाजीनगरहून ठाण्याकडे जात होते. उंभर्णी बोगद्याजवळ रस्त्याच्या मधोमध एक कार आडवी उभी होती. चालकाने इनोव्हा थांबवताच अर्टिगामधून चार ते पाच मास्कधारी हल्लेखोर उतरले.

दरोडेखोरांनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत दोघांनाही खाली उतरवले आणि त्यांच्याकडील रोकड, मोबाइल व इनोव्हा घेऊन पलायन केले. काही अंतरावर इनोव्हा सोडून आरोपींनी अन्य वाहनांतून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळ काढला. घटनेनंतर चार जिल्ह्यांतील पोलिसांनी समन्वयाने तपासाची सूत्रे हलवली.

या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत छत्रपती संभाजीनगरमधून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दरोडा

मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ते सहा महिला प्रवाशांचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. सातारा जिल्ह्यातील सालपे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड घडवून रेल्वे थांबवण्यात आली. त्यानंतर आरक्षित डब्यातील महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. यावेळी चोरट्यांनी एस-२, एस-३ आणि एस-४ डब्यांवर दगडफेकही केली. घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Infrastructure news
crime